पिंपरी / चिंचवड

गुटखा विक्री प्रकरणी तिघांवर गुन्हा दाखल

पिंपरी l प्रतिनिधी

शासनाने प्रतिबंधित केलेला गुटखा विक्री केल्याप्रकरणी तसेच विक्रीसाठी गुटखा पुरवल्याप्रकरणी तिघांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई सामाजिक सुरक्षा पथकाने सोमवारी (दि. 18) रात्री आंबेठाण येथे केली.

राहुल लल्लूराम तिवारी (वय 29, रा. आंबेठाण, ता. खेड. मूळ रा. उत्तर प्रदेश), ओमप्रकाश उर्फ ओमजी बिष्णोई (वय 45, रा. खालूंब्रे, ता. खेड), रामाराम चौधरी (वय 25, रा. खालूंब्रे, ता. खेड) अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत. याप्रकरणी पोलीस हवालदार अमोल साडेकर यांनी चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शासनाने प्रतिबंधित केलेला गुटखा आरोपी राहुल याने त्याच्या घरात विक्रीसाठी साठवून ठेवला. हा गुटखा आरोपी राहुल याला अन्य आरोपींनी पुरवला. याबाबत माहिती मिळाली असता पोलिसांनी सोमवारी रात्री राहुल याच्या घरावर छापा मारून कारवाई केली. त्यात पोलिसांनी 46 हजार 481 रुपये किमतीचा प्रतिबंधित गुटखा आणि 33 हजार 510 रुपये रोख रक्कम जप्त केली आहे. राहुल याला पोलिसांनी अटक केली आहे. चाकण पोलीस तपास करीत आहेत.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button