चाकण आणि चिंचवड मधून तीन दुचाकी चोरीला
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2021/09/two-wheeler-theft.png)
पिंपरी चिंचवड | चाकण आणि चिंचवड परिसरातून तीन दुचाकी तर सांगवी मधून महागडी सायकल चोरीला गेली आहे. याबाबत बुधवारी (दि. 1) संबंधित पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांच्या विरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.चंद्रकांत गोपीनाथ येल्लेवाड (वय 33, रा. डोंगरवस्ती, निघोजे. मूळ रा. नांदेड) यांनी चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. फिर्यादी यांची 40 हजारांची दुचाकी चोरट्यांनी त्यांच्या घरासमोरून चोरून नेली. हा प्रकार मंगळवारी (दि. 31) रात्री दहा ते बुधवारी (दि. 1) सकाळी पाच वाजताच्या कालावधीत घडला. चाकण पोलीस तपास करीत आहेत.
विजय कुंडलिक जाधव (वय 45, रा. स्वप्नशिल कॉलनी, चिंचवडेनगर, चिंचवड) यांनी चिंचवड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. फिर्यादी यांनी त्यांची 15 हजार रुपये किमतीची दुचाकी 19 ऑगस्ट रोजी सायंकाळी सहा वाजता चिंचवडेनगर येथील रामभाऊ बुलेट चहाच्या टपरीसमोर पार्क केली. अवघ्या 15 मिनिटांमध्ये चोरट्यांनी त्यांच्या दुचाकीचे लॉक तोडून दुचाकी चोरून नेली.सागर अप्पाराव कापसे (वय 30, रा. चिंचवडेनगर, चिंचवड) यांनी चिंचवड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. फिर्यादी यांनी त्यांची 35 हजार रुपये किमतीची दुचाकी 17 ऑगस्ट रोजी रात्री दहा वाजता त्यांच्या सोसायटीच्या पार्किंग मध्ये पार्क केली. रात्रीच्या वेळी अज्ञात चोरट्यांनी त्यांची दुचाकी चोरून नेली. हा प्रकार 18 ऑगस्ट रोजी उघडकीस आला. वरील दोन्ही गुन्ह्यांचा तपास चिंचवड पोलीस करीत आहेत.
विवेक वसंत वाणी (वय 46, रा. पिंपळे सौदागर) यांनी सांगवी पोलीस ठाण्यात सायकल चोरीबाबत फिर्याद दिली आहे. फिर्यादी यांच्या मुलाने त्यांची 20 हजार रुपये किमतीची सायकल बुधवारी (दि. 1) सकाळी सात वाजता सोसायटीच्या पार्किंग मध्ये पार्क केली. दुपारी पावणे तीन वाजता फिर्यादी यांच्या मुलाने पार्किंग मध्ये जाऊन सायकल पाहिली असता सायकल मिळून आली नाही. फिर्यादी यांनी परिसरात शोधाशोध केल्यानंतर पोलिसात धाव घेत गुन्हा नोंदवला. सांगवी पोलीस तपास करीत आहेत.