कलाटेनगरमध्ये भरदिवसा साडेतीन लाखांची घरफोडी
![Three and a half lakh burglary every day in Kalatenagar](https://mahaenews.com/wp-content/uploads/2021/08/burglary-gharfod-2.jpg)
पिंपरी चिंचवड | कलाटेनगर, वाकड येथील एका सोसायटीमध्ये अज्ञात चोरट्यांनी घरफोडी करून तीन लाख 40 हजारांचा ऐवज चोरून नेला. ही घटना शुक्रवारी (दि. 27) पहाटे पाच ते रात्री साडेदहा या कालावधीत टिआरा सोसायटीमध्ये घडली.विवेक रवींद्र पाटील (वय 30, रा. टिआरा सोसायटी, शंकर कलाटेनगर, वाकड. मूळ रा. जळगाव) यांनी याबाबत शनिवारी (दि. 28) वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, अज्ञात चोरट्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांचा फ्लॅट शुक्रवारी पहाटे पाच ते रात्री साडेदहा या कालावधीत कुलूप लावून बंद होता. दरम्यानच्या कालावधीत अज्ञात चोरट्याने फ्लॅटच्या दरवाजाचे लॅच लॉक उघडून आत प्रवेश केला. एका बेडरूम मधून एक लाख रुपयांचे दागिने, 15 हजार रुपये रोख रक्कम तसेच दुसऱ्या बेडरूममधून सव्वादोन लाख रुपये रोकड असा एकूण तीन लाख 40 हजारांचा ऐवज चोरून नेला. पोलीस उपनिरीक्षक शिंगारे तपास करीत आहेत.