पिंपरी / चिंचवड

एक लाख 80 हजारांचे सोन्याचे गंठण चोरट्यांनी पळवले

पिंपरी l प्रतिनिधी

सुनेसोबत पायी चालत जात असलेल्या सासूच्या गळ्यातील एक लाख 80 हजार रुपये किमतीचे सोन्याचे गंठण दोन अनोळखी चोरट्यांनी जबरदस्तीने हिसकावून नेले. ही घटना मंगळवारी (दि. 15) रात्री सव्वाआठ वाजता मोशी गावठाण, मोशी येथे घडली.

मंगल शंकर सस्ते (वय 49, रा. जुना आळंदी रोड, मोशी) यांनी याप्रकरणी एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार दोन अनोळखी चोरट्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी त्यांच्या सुनेसोबत मंगळवारी रात्री पायी चालत जात होत्या. रात्री सव्वाआठ वाजताच्या सुमारास त्या जुना देहू आळंदी रोड, मोशी गावठाण येथे आल्या असता एका दुचाकीवरून आलेल्या दोन अनोळखी चोरट्यांनी फिर्यादी यांच्या गळ्यातील एक लाख 80 हजार रुपये किमतीचे पावणे चार तोळे वजनाचे सोन्याचे गंठण जबरदस्तीने हिसका मारून ओढले आणि चोरून नेले. पोलीस उपनिरीक्षक सचिन चव्हाण तपास करीत आहेत.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button