उघड्या दरवाजावाटे एक लाख 67 हजारांची चोरी
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2021/06/theft-1.jpg)
पिंपरी चिंचवड | उघड्या दरवाजावाटे अज्ञात चोरट्यांनी घरात प्रवेश करून घरातून सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम असा एक लाख 67 हजारांचा ऐवज चोरून नेला. तसेच बेडरूममधील गादी जाळून नुकसान केले. ही घटना 27 जून रोजी दुपारी दगडू पाटिलनगर, थेरगाव येथे गुरुकुंज सोसायटीमध्ये उघडकीस आली.
विवेक अरुणकुमार इंदोरिया (वय 34, रा. गुरुकुंज सोसायटी, दगडू पाटिलनगर, थेरगाव) यांनी याबाबत वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञात चोरट्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,14 जून पहाटे साडेतीन ते 27 जून दुपारी पाच वाजताच्या कालावधीत अज्ञात चोरट्याने फिर्यादी यांच्या घराच्या उघड्या दरवाजावाटे घरात प्रवेश केला. घरातून एक लाख आठ हजार रुपये किमतीच्या सोन्याच्या दोन बांगड्या, 54 हजार रुपये किमतीचे मणी मंगळसूत्र आणि पाच हजार रुपयांची रोख रक्कम असा एक लाख 67 हजार रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला. तसेच अज्ञात चोरट्याने फिर्यादी यांच्या बेडरुममधील गादी जाळून त्याचे नुकसान केले. वाकड पोलीस तपास करीत आहेत.