ताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

पोलिसात तक्रार दिल्याच्या कारणावरून तरुणावर तलवारीने वार

पिंपरी चिंचवड | कुत्रा फिरवण्यासाठी गेल्यानंतर झालेल्या भांडणाची पोलिसात तक्रार दिली. या कारणावरून नऊ जणांनी मिळून एका तरुणावर तलवारीने वार केले. यामध्ये तरुण गंभीर जखमी झाला. ही घटना मंगळवारी (दि. 29) रात्री पावणेआठ वाजताच्या सुमारास भाटनगर पिंपरी येथे घडली.

देवदास मोहन मलकेकर (वय 20, रा. भाटनगर, पिंपरी) असे जखमी तरुणाचे नाव आहे. त्यांनी याबाबत पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार सुभाष माचरे, जयदेव सुभाष माचरे, राजतिलक सुभाष माचरे (तिघे रा. भाटनगर, पिंपरी), अजय परदेशी, विकी गायकवाड मळ्या, आशिष (पूर्ण नाव माहीत नाही) आणि अन्य तिघांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी त्यांच्या पाळीव कुत्र्याला फिरवण्यासाठी गेले होते. त्यावेळी त्यांचे आणि आरोपींचे भांडण झाले. आरोपींनी फिर्यादी यांना शिवीगाळ करून मारहाण केली. याबाबत फिर्यादी यांनी पिंपरी पोलीस चौकीमध्ये आरोपींच्या विरोधात तक्रार दिली. या कारणावरून आरोपीने फिर्यादी यांच्या घरासमोर जाऊन ‘तू आमच्या विरुद्ध तक्रार का दिली. तुला आज सोडणार नाही’. असे म्हणत बेकायदेशीर जमाव जमवून फिर्यादी यांना तलवारीने मारून जखमी केले. पिंपरी पोलीस तपास करीत आहेत.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button