दुचाकीस्वार महिलेच्या गळ्यातील सोनसाखळी हिसकावली
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2019/05/251002-chain-snaching.jpg)
पिंपरी l प्रतिनिधी
दुचाकीस्वार महिलेच्या गळ्यातील सोनसाखळी दोन चोरट्यांनी जबरदस्तीने हिसकावून नेली. ही घटना शनिवारी (दि. 22) रात्री साडेनऊ वाजता वाकड ब्रिज येथे घडली.
मृदुला संजय सिद्धेश्वर (वय 27, रा. हिंजवडी) यांनी याप्रकरणी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार दुचाकीवरील दोन अनोळखी चोरट्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी आणि त्यांची बहीण शनिवारी सायंकाळी तुळशीबाग पुणे येथे गेल्या होत्या. तिथून पूजेचे साहित्य खरेदी करून त्या दुचाकीवरून औंधमार्गे परत घरी येत होत्या. रात्री साडेनऊ वाजताच्या सुमारास वाकड ब्रिज येथे एका दुचाकीवरून आलेल्या दोन अनोळखी चोरट्यांनी फिर्यादी यांच्या गळ्यातील 30 हजार रुपये किमतीची एक सोनसाखळी जबरदस्तीने हिसकावून चोरून नेली. पुढील तपास हिंजवडी पोलीस करीत आहेत.