TOP Newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

कार्यकाळ संपला, अनेक नगरसेवकांपुढे काही वर्षांनी पहिल्यांदाच ‘माजी’ लागणार; आजपासून प्रशासकीय राजवट

पिंपरी चिंचवड | पिंपरी-चिंचवड महापालिकेतील नगरसेवकांचा रविवारी (दि.13) पाच वर्षाचा कार्यकाळ संपला आहे. त्यामुळे आजपासून प्रशासकीय राजवट सुरु झाली. आयुक्त राजेश पाटील हेच प्रशासक राहणार आहेत. महापौर, सभागृहनेते, विरोधी पक्षनेते, विविध समित्यांचे सभापती आणि नगरसेवक यांच्या पदापुढे आजपासून ‘माजी’ लागणार आहे.

सहा टर्म पूर्ण झालेले सर्वांत ज्येष्ठ योगेश बहल यांच्या नावापुढे 30 वर्षांनतर पहिल्यांदाच ‘माजी’ नगरसेवक लागणार आहे. तर, चार टर्म झालेल्या मंगला कदम, अजित गव्हाणे यांच्यानावापुढेही 20 वर्षांनी ‘माजी’ लागणार आहे. तर, सलग चारवेळा निवडून आलेले आणि पाचव्यावेळी स्वीकृत असलेल्या भाऊसाहेब भोईर यांच्यापुढेही 25 वर्षांनी माजी लागणार आहे.

महापालिका दाधिकाऱ्यांचा कार्यकाळ 13 मार्च रोजी संपला. 13 मार्चच्या सायंकाळी महापौर, उपमहापौर, सभागृहनेते, विषय समिती सभापती प्रभाग समिती सभापतींची वाहने पालिकेने ताब्यात घेतली. त्यांच्या कार्यालयांनाही टाळे ठोकण्यात आले. दिमतीला असणाऱ्या कर्मचाऱ्यांचीही इतरत्र बदली केली जाणार आहे. आजपासून महापालिकेत आयुक्त राजेश पाटील प्रशासक म्हणून कार्यभार पाहणार आहेत.

लोकप्रतिनिधी नसले तरी प्रशासकीय कामांमध्ये यामुळे काहीही बदल होणार नसल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. आजपासून महापौर किंवा नगरसेवक म्हणून मिरवता येणार आहे. पदाधिकारी आणि नगरसेवकांच्या नावापुढे ‘माजी’ लागणार आहे.सलग तीन टर्म पूर्ण झालेल्या सीमा सावळे, उषा वाघेरे, राजू मिसाळ, अपर्णा डोके, जयश्री गावडे, डब्बू आसवाणी यांच्या नावापुढे 15 वर्षांनी तर सलग दोन टर्म पूर्ण झालेल्या शीतल काटे, आशा शेंडगे, सुजाता पालांडे, आरती चोंधे, वैशाली काळभोर, गीता मंचरकर, विनया तापकीर, झामाबाई बारणे, अनुराधा गोफणे, पोर्णिमा सोनवणे, अश्विनी चिंचवडे, शत्रुघ्न काटे, नितीन काळजे, राहुल जाधव, शीतल शिंदे, विनोद नढे, राहुल भोसले, समीर मासूळकर, नवनाथ जगताप, मोरेश्वर भोंडवे यांच्या नावासमोर दहा वर्षांनी माजी नगरसेवक लागणार आहे. त्यामुळे नव्याने उमेदवारीची अपेक्षा असलेल्या एखाद्या नगरसेवकाला गल्लीत फिरताना विरोधी कार्यकर्ता माजी नगरसेवक आले, असा टोला हाणू शकतात.

 

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button