breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

‘अयोध्यातील मंदिर हे फक्त राम मंदिर नसून राष्ट्र मंदिर’; माहेश्वरी मराठे

श्रीरामाच्या जीवनावर आधारित चित्रकला स्पर्धेच्या बक्षीस समारंभात गौरोदगार

कलारंग संस्था व विश्व हिंदू परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने भव्य चित्रकला स्पर्धेचे बक्षीस वितरण

पिंपरी : विश्व हिंदू परिषद पिं.चिं व कलारंग सांस्कृतिक कलासंस्था पिं.चिं यांच्या संयुक्त विद्यमाने अयोध्येतील प्रभू श्रीरामांच्या आगमनानिमित्त भव्य चित्रकला स्पर्धा आयोजित करण्यात आली होती व त्या स्पर्धेचे बक्षिस वितरण समारंभ नुकताच चिंचवड येथे करण्यात आले.या स्पर्धेत पिंपरी चिंचवड शहरातील जवळपास ४२ शाळांनी, इयत्ता सहावी ते बारावी मधील १६३५ विद्यार्थ्यांनी आपला सहभाग नोंदवला. या स्पर्धेमध्ये रामायणातील प्रसंगा वरील विषय देण्यात आले होते त्यात १) श्रीराम व शबरी भेट, २) श्रीराम व केवट भेट, ३)नल नील व प्रभू श्रीराम, ४) रावण वध, ५)आपल्याला आवडणारा ” रामायणा ” मधिल प्रसंग आशा विविध विषयांवर चित्र काढायची स्पर्धा आयोजीत करण्यात आली होती.

या स्पर्धेच्या बक्षीस वितरण समारंभाला भाजपा पिं.चिं शहराध्यक्ष श्री.शंकरभाऊ जगताप,आमदार श्रीमती अश्विनी ताई जगताप, रा.स्व.संघाचे पिं ची जिल्हा कार्यवाह श्री माहेश्वरी जी मराठे, सामाजिक कार्यकर्ते सचिन(भैय्या)लांडगे,श्री नितिन वाटकर, पुणे ग्रामीण विभाग मंत्री विश्व हिंदू परिषद तसेच विश्व हिंदू परिषदेचे पिं चि अध्यक्ष श्री धनंजय गावडे,मा.नगरसेविका आनुराधा गोरखे,स्व.सुरेश गादिया यांचे चिरंजीव संदेश गादिया, आदी मान्यवर उपस्थित यावेळी ” शहराध्यक्ष श्री शंकरभाऊ जगताप यांनी आपले मनोगत व्यक्त करताना म्हणाले की,” एक चित्र मला असे दिसले,ज्यात मोदी जी लहान राम लला ला श्री राम मंदिरात घेऊन जात आहेत,हे चित्र मला खूप भावले, आणी आयोध्येतील श्री राम मंदिरात प्रभू श्री रामाची प्राणप्रतीष्ठा झाली हे पाहुन पुनच्छा एकदा रामराज्या चा शुभारंभ झाला असे या लहानग्या नी काढलेल्या चित्रातून वाटले. रा.स्व.संघाचे माहेश्वरी मराठे यांनी स्पर्धेबद्दल आपले मनोगत व्यक्त केले, यावेळी बोलताना म्हणाले, स्वामी विवेकानंद यांच्या सारखे देशभक्ती चे प्रेम या चित्रातून दिसून येते.भारत देशाचे भविष्य घडवणारे हे कलाकार आहेत असे त्यांनी संबोधले. एकाच वेळी १६०० पेक्षा जास्त विद्यार्थी श्री रामाच्या जीवनाचा अभ्यास करून चित्र रेखाटतात,हे या स्पर्धेचे मोठे यश आहे, मुला मुलींनी काढलेली चित्रं प्रतिभावंत कलाकारांना लाजवतील अशी आहेत.

आमदार श्रीमती आश्विनी ताई जगताप यांनी ही आपले मनोगत व्यक्त करताना म्हणाल्या की,या लहान चित्रकारांनी या चित्रकलेतून श्री रामाचे चित्र काढली हीच मुले उद्याचे देशाची भवितव्य आहेत,ती पुढे जाऊन आशीच सुंदर भारतमाता ही घडवतील हिच अपेक्षा. विश्व हिंदू परिषदेचे नितीन वाटकर यानी ही आपले मनोगत मांडताना म्हणाले की,आयोध्येतील प्रभू श्री राम यांचे मंदिर हिंदू च्या ५०० वर्षाच्या संघर्षातून उभे राहिले आहे.आणी आपल्या सर्वांचे भाग्य आहे की त्यांचे लोकार्पण आपल्याला प्रत्यक्षात पहायला मिळाले. याच्या पेक्षा दुसरे भाग्य कोणते असे ही ते म्हणाले. नॉवेल ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट चे संस्थापक अध्यक्ष :अमित गोरखे यांच्या संकल्पनेतून तसेच विश्व हिंदू परिषद पिं.चिं चे अध्यक्ष श्री धनंजय गावडे यांच्या सहयोगाने या भव्य चित्रकलेचे स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. २२ जानेवारी २०२४ रोजी आयोध्येत प्रभू श्री राम यांचे भव्य दिव्य असे मंदीर उभारले जात आहे त्या मंदिरात प्रभू श्री रामांची प्राणप्रतिष्ठा होत आसताना पिं.चिं शहरात असा भव्य उपक्रम घेण्यात आला होता. लहान मुलांपासून ते जेष्टां पर्यंत संपुर्ण वातावरण राममय झाले होते.

हेही वाचा – राजकीय पक्ष स्थापन करणार का? मनोज जरांगे पाटील म्हणाले..

या स्पर्धेला विशेष बक्षिस देखील ठेवण्यात आले आहे या स्पर्धेत प्रथम पारितोषिक दिवंगत आमदार कै. लक्ष्मणभाऊ जगताप यांच्या स्मरणार्थ रोख १५,००० रुपये व स्मृतिचिन्ह, द्वितीय पारितोषिक कै. हिराबाई किसनराव लांडगे यांच्या स्मरणार्थ रूपये १०,००० रुपये व स्मृतिचिन्ह, तृतीय पारितोषिक कै. गणपतराव गोरखे यांच्या स्मरणार्थ रोख ७,५०० रुपये व स्मृतिचिन्ह, चतुर्थ पारितोषिक कै.सुरेश गादिया यांच्या स्मरणार्थ रोख ५,००० रुपये व स्मृतीचिन्ह, कै. सुनंदा यशवंत मिठभाकरे यांच्या स्मरणार्थ रोख २१०० रुपये व स्मृतिचिन्ह ठेवण्यात आले आहे. या स्पर्धेचे प्रथम क्रमांक वी.के. माटे स्कूल मधिल कू मल्हार नरहरी प्रभुमिराशी याने पटकवला आहे, तर द्वितीय क्रमांक एस.एन.बी.पी. स्कूल मधिल कुमारी आर्या सुनिल निंबाळकर हिने पटकवला आहे,तर तृतीय क्रमांक कमल नयन बजाज स्कूल मधिल प्रेरना शिर्के हिने पटकवला आहे, तसेच चतुर्थ क्रमांक सिटी प्राइड स्कूल चा सिद्धांत अगरवाल याने पटकवला आहे,तर पाचवा क्रमांक नोव्हेल स्कूल ची कु पायल नारखेडे हिने पटकवला आहे.सर्व विद्यार्थ्यांनी अतिशय सुंदर चित्र रेखाटले असून विषय अवघड असतानाही अभ्यास करून शबरी श्रीराम भेट,केवट श्रीराम भेट, अशी चित्र रेखाटन म्हणजे स्पर्धेचा अभूतपूर्व यश आहे.

स्पर्धेचे परीक्षण पिंपरी चिंचवड मधील चित्रकार सुनील शेगावकर, प्रसिद्ध फोटोग्राफर देवदत्त कशाळीकर, प्रसिद्ध मूर्तिकार सदानंद टिपूगुडे व सुमित काटकर ,ज्योती कुंभार यांनी केले. सर्व स्पर्धे मधे ज्यांनी सहभाग घेतला, ज्यांना या स्पर्धेची जबाबदारी दिली होती आशा सर्वांचे त्याच बरोबर परीक्षकांचे, पाहुण्यांचे , कलारंग सांस्कृतिक कलासंस्थेचे अध्यक्ष अमित गोरखे यांनी आभार मानले.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button