breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

‘तेजस्विनी’ महिला बचत गटाच्या दुस-या रिटेल शॉपचे उद्घाटन

पिंपरी / महाईन्यूज

पिंपरी-चिंचवड महापालिका व महिला आर्थिक विकास महामंडळाच्या संयुक्त विद्यमानाने “मिशन स्वावलंबन प्रकल्प अंतर्गत संत तुकाराम भाजी मंडई, यमुनानगर, निगडी येथे बचत गटातील महिलांनी उत्पादित केलेल्या वस्तूंना व खाद्य पदार्थांना हक्काची बाजारपेठ उपलब्ध व्हावी, यासाठी “तेजस्विनी” महिला बचत गट रिटेल शॉपच्या दुसऱ्या शाखेचे उदघाटन एड. सुप्रिया उत्तम केंदळे आणि नागरवस्ती विकास योजना विभागाचे समाज विकास अधिकारी संभाजी ऐवले यांच्या हस्ते आज करण्यात आले.

यावेळी कनक खरे (मिशन स्वावलंबन, प्रकल्प सल्लागार, माविम पुणे), प्रशांत कवटे (मार्केटिंग सल्लागार, मिशन स्वावलंबन) यांची प्रमुख उपस्थिती होती. तेजस्विनी रिटेल शॉपच्या माध्यमातून बचत गटातील महिलांना आपले उत्पादन विक्री करण्याकरिता हक्काचे व्यासपीठ मिळाले आहे. अश्या पद्धतीचे रिटेल आउटलेट योग्य बाजारभाव मिळण्यास उपरोक्त ठरणार आहे. भविष्यात, मिशन स्वावलंबन प्रकल्पांतर्गत पिंपरी-चिंचवड महापालिका हद्दीत विविध ठिकाणी “तेजस्विनी” नावाने रिटेल चैन शॉप स्थापन करण्याचे नियोजन आहे, अशी भावना यावेळी बचत गटाच्या पदाधिका-यांनी व्यक्त केली.

 

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button