पिंपरीत रिक्षा संपाचा फज्जा उडाला : बाबा कांबळे
![The rickshaw strike in Pimpri has gone awry: Baba Kamble](https://mahaenews.com/wp-content/uploads/2022/12/Auto-Rikshaw.jpeg)
- पुणे पिंपरी चिंचवड शहरात सर्व रिक्षा व्यवस्था सुरळीत सुरू
पिंपरी । महाईन्यूज । प्रतिनिधी
पिंपरी चिंचवड शहरात बोगस रिक्षा संघटनांच्या वतीने पुकारण्यात आलेल्या रिक्षा बंदचा फज्जा उडाला आहे. शहरात सर्वत्र रिक्षा सेवा सुरळीत सुरू असून नागरिकांची होणारी गैरसोय टळली आहे. महाराष्ट्र रिक्षा पंचायतीने यामध्ये सहभाग घेतला नव्हता. त्यामुळे बोगस संघटनांचे रिक्षा बंद आंदोलन यशस्वी झाले नसल्याचे प्रतिपादन महाराष्ट्र रिक्षा पंचायतचे अध्यक्ष बाबा कांबळे यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे केले.
प्रसिद्धीपत्रकात नमूद केले आहे की, महाराष्ट्र रिक्षा पंचायतसह राज्याच्या समितीने आंदोलन केल्याने ओला उबेर ऍप्लिकेशन मधून टू व्हीलर विभाग रद्द करण्यात आले आहे. त्याबाबत प्रशासन युद्ध पातळीवर काम करत आहे. पुणे प्रशासनाने केलेल्या कामाचे अभिनंदन करण्यात आले. महाराष्ट्र रिक्षा पंचायत ऑटो रिक्षा चालक मालक संघटना संयुक्त संयुक्तकृती समिती व सोबत असलेल्या सर्व संघटनेचा हा विजय आहे. संघटनेच्या सातत्याने लढाईमुळे लवकरच रॅपिडो मधून देखील रद्द होणार असे आश्वासन प्रशासनाच्या वतीने देण्यात आले असल्याचे बाबा कांबळे म्हणाले.
पुणे जिल्ह्यातील काही बोगस संघटनांनी एकत्र येत रिक्षा बंद आंदोलन पुकारले होते. पुणे जिल्ह्याधिकाऱ्यांनी रिक्षा बंद मध्ये सहभागी न होण्याचे आवाहन केले होते. त्याला सकारात्मक प्रतिसाद देत महाराष्ट्र रिक्षा पंचायत व अन्य सहकारी संघटनांनी आंदोलन न करण्याचा निर्णय घेतला. यामुळे आंदोलनाचा फज्जा उडाला आहे. केवळ शहरात काही ठिकाणी जमून विरोध करण्याचा प्रयत्न केला. मात्र अपयशी ठरला आहे.
रिक्षा चालक मालकांच्या विविध मागण्या शासन स्तरावरून मंजूर करून आणायचे असेल तर धमक लागते. ती धमक रिक्षा पंचायतीच्या पदाधिकाऱ्यांमध्ये आहे. अनेक आंदोलन मार्गी लावुन न्याय मिळवून दिला आहे. शासनाच्या आव्हानाला सकारात्मक प्रतिसाद दिला असेल तरी 18 तारखेपर्यंत वाट पाहणार आहोत. रिक्षा चालकांचे प्रश्न न सोडविल्यास 19 तारखेला देशभर एकाच वेळी आंदोलन करण्यात येणार असल्याचा इशारा बाबा कांबळे यांनी दिला.