नॉव्हेल इन्स्टिट्युटच्या व्यवस्थापिका डॉ. प्रिया अमित गोरखे यांना ‘पीएचडी’
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2021/03/e4c37990-574d-4308-b5fc-0b251d8aff4c.jpg)
- सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रातून अभिनंदनाचा वर्षाव
पिंपरी / महाईन्यूज
डॉ. प्रिया अमित गोरखे यांना नुकतीच पुण्यातील भारती विद्यापीठाकडून पीएचडी (मॅनेजमेंट स्टडीज) पदवी प्रदान करण्यात आली. त्यांनी वैद्यकीय सेवांचा गुणवत्ता व्यवस्थापन अभ्यास या विषयावर प्रबंध सादर केला. त्यांच्या यशाबद्दल सामाजिक आणि शैक्षणिक क्षेत्रातून त्यांचे अभिनंदन करण्यात आले.
डॉ. प्रिया अमित गोरखे यांनी वैद्यकीय क्षेत्रातील बीएएमएस पदवी प्राप्त केली आहे. त्यांनी एमबीए देखील पूर्ण केले. त्यानंतर डॉ. अँथोनी रोज यांच्या मार्गदर्शनाखाली ‘रुग्णालयांमधील वैद्यकीय सेवांचा गुणवत्ता व्यवस्थापन अभ्यास’ (A Study of Quality Management of medical services in Hospitals) या विषयावर त्यांनी संशोधन केले. त्यांनी सादर केलेल्या प्रबंधाला विद्यापीठाकडून मान्यता मिळाली. भारती विद्यापीठाकडून त्यांना पीएचडी प्रदान करण्यात आली.
पीएचडी पूर्ण करताना पती अमित गोरखे व सासू नगरसेविका अनुराधा गोरखे यांचे सातत्याने प्रोत्साहन मिळाले. त्यामुळे माझ्या यशाचे श्रेय या दोघांना जाते, अशी भावना डॉ. प्रिया यांनी व्यक्त केली.
डॉ. प्रिया या नॉव्हेल इंटरनॅशनल स्कूलमध्ये ‘स्कूल मॅनेजर’ म्हणून कार्यरत आहेत. नॉव्हेल ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटचे प्राचार्य वैभव फंड, नगरसेविका अनुराधा गोरखे, संचालक विलास जेऊरकर, अमित गोरखे व कर्मचा-यांनी त्यांच्या यशाबद्दल अभिनंदन केले आहे.