ताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

फोरम ऑफ स्मॉल स्केल इंडस्ट्रीज असोसिएशनतर्फे बुधवारी महिला रोजगार मेळावा

पिंपरी चिंचवड | महिलांना औद्योगिक क्षेत्रातील मशनरीचे ट्रेनिंग आणि रोजगार निर्माण करण्यासाठी फोरम ऑफ स्मॉल स्केल इंडस्ट्रीज असोसिएशन मार्फत उद्या (बुधवारी) महिला रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती अभय भोर यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली.भोसरी प्लॉट नंबर T 97 एमआयडीसी पोस्ट ऑफिस, बालाजीनगर जवळील अभय दादा भोर संपर्क कार्यालय येथे हा मेळावा होणार आहे.

अभय भोर म्हणाले, पिंपरी-चिंचवड शहरात महिलांची बेरोजगारी संख्या वाढती आहे. शहरातील कंपन्यांमध्ये विविध प्रकारचे जॉब महिलांना देण्यासाठी तसेच महिलांना उद्योग क्षेत्रातील मशनरी बाबत तंत्रज्ञान देऊन कामाच्या नवीन संधी निर्माण करण्यासाठी रोजगार मेळावा आयोजित करण्यात आला आहे. त्याच्या माध्यमातून शहरातील तरुण-तरुणींना रोजगाराची संधी देण्यात येणार आहे. अधिक माहितीसाठी 9960877897 या मोबाईल नंबरवर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button