कानातून हृदयात उतरणारा युगांतक आवाज हरपला : आरती चोंधे
![The epoch-making sound that reaches the heart through the ears is lost: Aarti Chondhe](https://mahaenews.com/wp-content/uploads/2022/02/WhatsApp-Image-2022-02-09-at-4.02.08-PM.jpeg)
पिंपरी | प्रतिनिधी
कानातून हृदयात उतरणारा युगांतक आवाज हरपला. शरीर जरी गेले असले तरी लाटा दिदींचा आवाज नेहमी आपल्या हृदयात राहील, आशा शब्दात नगरसेविका आरती चोंधे यांनी लाटा मंगेशकर यांना श्रद्धांजली अर्पण केली.
प्रभाग क्रमांक 26 (नविन प्रभाग क्रमांक 39) विशालनगर पिंपळे निलख येथे भारतीय जनता पार्टी व भारतीय जनता युवा मोर्चा यांच्या वतीने स्वरसम्राज्ञी गानकोकिळा भारतरत्न स्व. लता मंगेशकर यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. त्यावेळी प्रभागाच्या नगरसेविका आरतीताई चोंधे व सुधाकर हवेले यांच्या हस्ते लता मंगेशकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून श्रद्धांजली वाहण्यात आली.
यावेळी फिरंगोजी कामठे, उदय मोघे, पुरुषोत्तम दोमकुंडवार, भरत इंगवले, सुभाष इंगळे, जयसिंगराव डुंबरे, सुधाकर वेदपाठक, पिंपरी चिंचवड ज्येष्ठ नागरिक महासंघाच्या कार्याध्यक्षा वृषाली मरळ व परिसरातील नागरिकांनी लतादिदींच्या प्रति भावना व्यक्त करून श्रद्धांजली वाहिली. तसेच सदर कार्यक्रमास रावसाहेब बाळसराफ, सुभेदार अब्दुल हमीद, विजय भोसले, बाळासाहेब इंगवले, अरविंद पाटील, अर्जुन पटेल, कृष्णा खिरीड, उमेशकांत कुलकर्णी, कचेश्वर साळुंखे, शरद गाळणकर, अनंता लोखंडे, पवन कामठे, विक्रांत गंगावणे, रुपालीताई भोजणे सरपंच जारकर वाडी, वैजयंती कुलकर्णी, सुगंधा काळे, सुवर्णा गाडे, विजयमाला पिसे तसेच विद्या विनय निकेतन विद्यालयातील शिक्षक व परिसरातील नागरिक उपस्थित होते.
सदरील कार्यक्रमाचे आयोजन नगरसेविका आरती चोंधे यांनी केले. मुख्याध्यापक अनंतराव गर्जे यांनी सूत्रसंचालन केले.