पिंपरी / चिंचवड

फसवणूक करून कंपनीचे संचालक आणि मॅनेजर पसार

पिंपरी l प्रतिनिधी

कंपनीला सुरक्षा रक्षक पुरविणाऱ्या एजन्सीला त्यांचे बिल पेमेंट न देता लाखो रुपयांची फसवणूक करून कंपनीचे संचालक आणि मॅनेजर पळून गेले. ही घटना मार्च 2021 ते 30 जून 2021 या कालावधीत अन्नदाता मल्टीसर्व्हिस प्रा ली आदित्य शगुल मॉल, बावधन येथे घडली.

वैभव अमृत पाटील (वय 33, रा. आळंदी रोड, पुणे. मूळ रा. शिरढोण, ता. कवठेमहांकाळ, जि. सांगली) यांनी याप्रकरणी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार राजू भीमराव साळवे (रा. वारजे माळवाडी, पुणे), ज्योती राजू साळवे, मॅनेजर कुमार श्रीधर गोडसे यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी वैभव पाटील यांची सुरक्षा रक्षक पुरविण्याची एजन्सी आहे. आरोपींनी त्यांच्या कंपनीसाठी पाटील यांच्या एजन्सीकडून सुरक्षा रक्षक घेतले होते. मॅनेजर गोडसे याने त्याबाबतची वर्क ऑर्डर पाटील यांना दिली होती. मार्च 2021 ते 30 जून 2021 या कालावधीत सुरक्षा रक्षक पुरविल्याचे एकूण नऊ लाख सहा हजार 810 रुपये पेमेंट न देता आरोपी पळून गेले असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश खारगे तपास करीत आहेत.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button