ताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवडपुणे
थंडीचा कडाका वाढला! पारा 11.8 अंशापर्यंत खाली घसरला
पिंपरी चिंचवड | पुणे, पिंपरी-चिंचवड परिसरात मागील दोन दिवसांपासून थंडीचा कडाका वाढला आहे. शहरातील तापमानात घट झाली असून आज (बुधवारी) सकाळी 11.8 अंश सेल्सियस तापमानाची नोंद झाली आहे.ऐन दिवाळीत पावसाने जोरदार हजेरी लावली होती. दिवाळी संपल्यानंतर हवेतील गारठा वाढू लागला. हिवाळा सुरु झाल्यानंतर तब्बल दीड महिन्याच्या विलंबाने यंदा थंडीचे आगमन झाले. थंडीची हुडहुडी भरु लागली. दिवाळीनंतर तापमानात घट होत आहे.
पुणे जिल्ह्यात मंगळवारी कमाल 30.6 तर किमान 12.7 अंश सेल्सियस तापमानाची नोंद झाली. तर, आज बुधवारी पारा घसरला. किमान 11.8 अंश सेल्सियस तापमानाची नोंद झाली. त्यामुळे गारठा वाढू लागला आहे.