ताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

प्रभाग क्रमांक १० मधून भाजप उमेदवाराला कामगार संघटनेचा पाठिंबा

मिशन- PCMC : “कामगार संघटनेचा पाठिंबा प्रोत्साहन, विकास आणि जनहितासाठी कटिबद्धतेचा संदेश”

पिंपरी-चिंचवड | पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या आगामी सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक १० मधून भारतीय जनता पक्षाच्या उमेदवाराला महाराष्ट्र राज्य माथाडी ट्रान्सपोर्ट, सुरक्षा रक्षक आणि जनरल कामगार संघटनेने आज अधिकृत पाठींबा जाहीर केला.

या संघटनेने कामगारांच्या हितासाठी सातत्याने कार्य केले आहे आणि पिंपरी-चिंचवड तसेच पुणे परिसरातील औद्योगिक क्षेत्रातील कामगारांसाठी काम केलेले आहे. संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले की, भाजपच्या उमेदवाराने समाजहिताचे राजकारण आणि विकासमुखी दृष्टीकोन जोपासल्यामुळे संघटनेने हा पाठींबा देण्याचा निर्णय घेतला.

हेही वाचा     :      पिंपरी चिंचवड महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५-२६ : अंतिम उमेदवारांची यादी जाहीर

संघटनेचे सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्ते भाजपच्या विचारधारा आणि लोककल्याणकारी धोरणांवर विश्वास ठेवून प्रचारात सक्रिय सहभाग घेऊन उमेदवाराच्या विजयासाठी काम करतील, असेही पदाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.

हा जाहीर पाठिंबा महाराष्ट्र राज्य माथाडी ट्रान्सपोर्ट, सुरक्षा रक्षक आणि जनरल कामगार संघटनेचे पुणे जिल्हा अध्यक्ष आझमभाई खान यांच्या हस्ते आमदार अमित गोरखे यांच्या कार्यालयात लेखी पत्राद्वारे सुपूर्द करण्यात आला. या प्रसंगी संघटनेचे प्रमुख पदाधिकारी, कामगार नेते तसेच भाजपचे पदाधिकारी उपस्थित होते.

महाराष्ट्र राज्य माथाडी ट्रान्सपोर्ट, सुरक्षा रक्षक आणि जनरल कामगार संघटनेचा पाठिंबा आमच्यासाठी केवळ प्रोत्साहन नाही, तर समाज आणि कामगारांसाठी केलेल्या आमच्या प्रयत्नांचे मान्यताप्राप्तिकरण आहे. प्रभाग क्रमांक १० मधील नागरिकांच्या विकासासाठी आणि त्यांच्या जीवनमान उंचावण्यासाठी आम्ही सातत्याने काम करत राहू. भारतीय जनता पक्षाच्या धोरणांनुसार जनहिताचे निर्णय घेणे, सार्वजनिक सुविधा सुधारणे आणि रोजगारसंधी निर्माण करणे हे आमचे ध्येय आहे. संघटनेच्या सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या सहकार्याने या दृष्टीकोनाला अधिक वेगाने पुढे नेऊ.

– अमित गोरखे, आमदार.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button