ताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

मानलेल्या सुनेने घरफोडी करून दोन लाखांचा ऐवज पळवला

पिंपरी चिंचवड | मानलेल्या सुनेने, तिचा भाऊ आणि अन्य एकाने मिळून एका वृद्ध महिलेच्या घरातील दोन लाख दोन हजार 100 रुपये किमतीचे दागिने व इतर साहित्य चोरून नेले. ही घटना 21 ते 23 ऑगस्ट दरम्यान स्कायलाइन बिल्डिंग दिघी येथे घडली.शर्मिला महादेव वाबळे (वय 30), तिचा भाऊ अक्षय महादेव वाबळ (वय 26, दोघे रा. गोलेगाव, ता. शिरूर) आणि एक अनोळखी व्यक्ती (नाव पत्ता माहीत नाही) अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत. मंगला हनुमंत जाधव (वय 66, रा. स्कायलाइन बिल्डिंग, दिघी) यांनी बुधवारी (दि. 1) दिघी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, महिला फिर्यादी मंगला जाधव या सातारा येथे कामानिमित्त गेल्या होत्या. त्यावेळी त्यांची मानलेली सून आरोपी हिने तिच्याकडे असलेल्या चावीने फिर्यादी यांच्या घराचे कुलूप उघडले. बेडच्या खाली ठेवलेली कपाटाची चावी घेऊन कपाटातील आणि घरातील 47 ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने, रोख रक्कम, घरातील भांडी व इतर साहित्य असा दोन लाख दोन हजार 100 रुपये किमतीचा ऐवज चोरून नेला. पोलीस उपनिरीक्षक भंडारे तपास करीत आहेत.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button