‘पोस्ट’च्या वीमा योजनेचा लाभ घ्या : कैलास कुटे यांचे आवाहन
![Take Advantage of 'Post' Insurance Scheme: Kailas Kute's Appeal](https://mahaenews.com/wp-content/uploads/2022/07/WhatsApp-Image-2022-07-26-at-6.51.18-PM.jpeg)
- नागरिकांचा भरघोस प्रतिसाद
- नागरिकांकडून उपक्रमाची मुदत वाढवण्याची मागणी
पिंपरी : भारतीय डाक विभागाच्या वतीने सर्वसामान्य नागरिकांना आरोग्य व वीमा सुविधा उपलब्ध व्हावी. याकरिता खास योजना सुरू झाली आहे. त्याबाबतची कार्यवाही सुरू झाली असून, अधिकाधिक नागरिकांनी या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन सामाजिक कार्यकर्ते कैलास कुटे यांनी केले आहे.
आकुर्डीतील सामाजिक कार्यकर्ते कैलास कुटे यांच्या पुढाकाराने भारतीय डाक विमा योजनेचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी सेवानिवृत्त पोलीस अधिकारी गुलाबराव जगदाळे, सामाजिक कार्यकर्ते रामचंद्र साळुंखे,पोस्ट कार्यालयाचे अशोक अवघडे आदी उपस्थित होते.
आम्हाला लहान मूल असल्यामुळे भारतीय डाक विभागाच्या योजनांचा लाभ घेण्यासाठी दूर अंतरावर जाणे शक्य होत नव्हते. मात्र, सामाजिक कार्यकर्ते कैलास कुटे यांनी परिसरातच या योजनेचा लाभ देण्यास सुरूवात केली. हा उपक्रम सामान्य नागरिकांच्या हिताचा आहे, अशा भावना स्थानिक नागरिकांनी व्यक्त केल्या. तसेच, फक्त ३९९ रुपयांमध्ये नागरिकांना १० लाख रूपयांचा अपघाती विमा मिळत आहे त्यामुळे या विधायक उपक्रमाबाबत स्थानिक नागरिकांनी सामाजिक कार्यकर्ते कैलास कुटे यांचे आभार मानले आहेत.
सुकन्या समृध्दी योजना खाते उघडल्यापासून ते मुलीचे वय २१ वर्ष पूर्ण झाल्यावर जमा रक्कम व्याजासकट मुलीच्या आई वडिलांना दिली जाते.कैलास कुटे यांनी विविध योजनांसाठी आलेल्या सर्व नागरिकांना भविष्यात अशीच समाज उपयोगी कामे करत राहू असे आश्वासन दिले आणि नागरिकांचे आभार व्यक्त केले