अंजली कुलकर्णी आणि रमा सरोदे यांना स्वयंसिद्धा पुरस्कार जाहीर, शनिवारी वितरण
![Swayamsiddha Award to Anjali Kulkarni and Rama Sarode announced, distribution on Saturday](https://mahaenews.com/wp-content/uploads/2021/11/pjimage-2021-11-14T174800.419-1.jpg)
पिंपरी चिंचवड | स्वयंसिद्धा प्रतिष्ठान, पिंपरी चिंचवड यांच्या वतीने दिला जाणारा यावर्षीचा स्वयंसिद्धा पुरस्कार ज्येष्ठ साहित्यिका अंजली कुलकर्णी आणि अॅड. रमा सरोदे यांना जाहीर करण्यात आला आहे. बीना एज्युकेशन ट्रस्टचे संस्थापक, अध्यक्ष इकबाल खान व रामकृष्ण मोरे महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अभय खंडागळे यांच्या प्रमुख उपस्थितीत शनिवारी (दि.20) सकाळी 10 वा. या पुरस्कारांचे वितरण केले जाणार आहे.प्रा. रामकृष्ण मोरे कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, म्हाळसकांत चौक, आकुर्डी येथे हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. पुरस्काराचे हे 5 वे वर्ष आहे. यावेळी ‘इंटरनेट युगात, वर्तमानपत्राचे महत्व’ या विषयावर परिसंवाद आयोजित करण्यात आला आहे. परिसंवादात जेष्ठ पत्रकार व सामाजिक कार्यकर्ते डॉ. सुरेश बेरी, पत्रकार पितांबर लोहार आणि ‘एमपीसी न्यूज’चे सहयोगी संपादक अनिल कातळे आपले विचार मांडतील.
स्वयंसिद्धा प्रतिष्ठानच्या अध्यक्ष सविता इंगळे, स्वागताध्यक्ष दिनेश भोसले, उपाध्यक्ष नंदकुमार मुरडे, सचिव ज्ञानेश्वर भंडारे, कार्यवाह समृद्धी सुर्वे, कोषाध्यक्ष वर्षा बालगोपाल आदी कार्यक्रमाचे निमंत्रक आहेत.