पिंपरी / चिंचवड

स्वयंघसोहित भाईंनी स्नॅक्स सेंटर चालकाकडून घेतली 100 रुपयांची खंडणी : तिघांना अटक

पिंपरी l प्रतिनिधी

स्नॅक्स सेंटरवर नाष्टा केल्यानंतर पैसे न देता तिघांनी स्नॅक्स सेंटर चालकाला व कामगाराला शिवीगाळ केली. आपण या एरियातील भाई असल्याचे धमकावत स्नॅक्स सेंटर चालकाकडून 100 रुपये खंडणी घेतली. याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना रविवारी (दि. 27) सकाळी नऊ वाजता उद्यमनगर पिंपरी येथे घडली.

नितीन श्रीराम मोरे (वय 37), नितीन आनंद डोंगरे (वय 35), विश्वजित पायाळ (वय 35), गौतम श्रीराम मोरे (वय 38, सर्व रा. विठ्ठलनगर, पिंपरी) अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत. याप्रकरणी विनोद किसन शिंदे (वय 37, रा. संत तुकारामनगर, पिंपरी) यांनी पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी विनोद शिंदे यांचे उद्यमनगर पिंपरी येथे स्नॅक्स सेंटर आहे. रविवारी सकाळी नऊ वाजताच्या सुमारास आरोपी चौघेजण शिंदे यांच्या स्नॅक्स सेंटरवर नाष्टा करण्यासाठी आले. त्यांनी नाष्टा केल्यानंतर त्याचे पैसे न देता स्नॅक्स सेंटर वरील कामगाराला शिवीगाळ केली. आरोपी गौतम मोरे याने ‘आम्ही या एरियातले भाई आहे. मी पैसे देणार नाही. उलट तू इथे दुकान चालवतोस. त्याचे दर महिन्याला तुला आम्हाला पैसे द्यावे लागतील. जर तू आम्हाला पैसे दिले नाही. तर तुझ्या दुकानातील कामगार व तुला खूप मारीन आणि दुकान तोडून टाकीन’ अशी धमकी दिली. या महिन्याचे हप्त्याचे पैसे दे म्हणत आरोपींनी शिंदे यांच्याकडून 100 रुपये खंडणी नेली. पोलीस उपनिरीक्षक पुरुषोत्तम चाटे तपास करीत आहेत.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button