मामुर्डी- किवळे- विकासनगर- रावेत- गुरूद्वारा परिसराच्या सर्वांगीण विकासासाठी ‘‘घड्याळ’’ला साथ द्या!
मिशन- PCMC: प्रभाग १६ मधून आशा तानाजी भोंडवे यांचे आवाहन

पिंपरी-चिंचवड : मामुर्डी–किवळे–विकासनगर–रावेत–गुरूद्वारा परिसरातील प्रभाग क्रमांक १६ मधून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने सौ. आशा तानाजी (आप्पा) भोंडवे यांनी निवडणूक रिंगणात उतरण्याची घोषणा केली आहे. यानिमित्ताने त्यांनी मतदार बंधू-भगिनींशी संवाद साधत आपल्या कार्याचा आणि कुटुंबाच्या सामाजिक वारशाचा आढावा घेतला.
सौ. भोंडवे यांनी सांगितले की, निवडणूक लढवणे हा केवळ एक राजकीय टप्पा नसून, प्रभागातील नागरिकांच्या जीवनात सकारात्मक बदल घडवण्याचा संकल्प आहे. शिक्षण, स्वच्छता, रस्ते, पाणीपुरवठा, शेतकरी व सामान्य नागरिकांचे प्रश्न सोडवणे हे आपले प्राधान्य असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
भोंडवे कुटुंबाचा सामाजिक आणि विकासात्मक वारसा अधोरेखित करताना त्यांनी आपल्या सासरे कै. बबनराव भोंडवे यांच्या कार्याचा उल्लेख केला. ग्रामपंचायत सदस्य ते सरपंच या पदावर काम करताना त्यांनी रावेत गावाच्या विकासासाठी मोलाचे योगदान दिले. संरक्षण विभागाकडून १८०० एकर शेतजमीन बाधित करण्याचा निर्णय असताना, शेतकरी आणि नागरिकांचे हक्क सुरक्षित ठेवण्यासाठी त्यांनी निर्णायक भूमिका बजावली, असे सौ. भोंडवे यांनी सांगितले.
हेही वाचा – राज्यात थंडी वाढणार? तापमान पुन्हा एक अंकी…

तसेच पती श्री. तानाजी (आप्पा) भोंडवे यांनीही शेतकरी, नागरिक आणि सामान्य माणसांच्या प्रश्नांसाठी सातत्याने कार्य केल्याचे त्यांनी नमूद केले. हा सामाजिक सेवेचा वारसा पुढे नेण्याची जबाबदारी आता आपण स्वीकारत असल्याचे त्यांनी सांगितले.
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे नेतृत्व आणि राज्याचे उपमुख्यमंत्री मा. अजितदादा पवार यांच्या मार्गदर्शनामुळे आपल्याला बळ मिळत असल्याचेही सौ. भोंडवे यांनी यावेळी सांगितले. “घड्याळ तेच, फक्त वेळ नवी” असा संदेश देत, प्रभागातील नागरिकांनी योग्य प्रतिनिधी निवडून देण्याचे आवाहन त्यांनी केले.
प्रभाग क्रमांक १६ मधील सर्व भागांचा सर्वांगीण विकास साधण्यासाठी आपण कटिबद्ध असल्याचा विश्वास व्यक्त करत, सौ. आशा तानाजी भोंडवे यांनी मतदारांकडून आशिर्वाद आणि पाठिंब्याची अपेक्षा व्यक्त केली आहे.
महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा
“प्रभाग क्रमांक १६ मधील प्रत्येक नागरिकाचे प्रश्न हे माझे स्वतःचे प्रश्न आहेत. रस्ते, पाणी, स्वच्छता, शिक्षण आणि शेतकऱ्यांचे हक्क या सर्व बाबींमध्ये ठोस, पारदर्शक आणि वेळेत विकासकामे करून आपल्या प्रभागाचा सर्वांगीण विकास घडवण्याचा माझा प्रामाणिक प्रयत्न राहील.”
– आशा तानाजी भोंडवे, उमदेवार, राष्ट्रवादी, प्रभाग- 16.




