Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड
दुख:द बातमी : दैनिक ‘केसरी’चे ज्येष्ठ पत्रकार विजय भोसले कालवश
पिंपरी : पिपरी-चिंचवड शहरातील दै. केसरीचे ज्येष्ठ पत्रकार विजय भोसले यांचे दुःखद निधन झाले आहे. दोनच दिवसापूर्वी भोसरी येथील एका खाजगी रुग्णालयाच्या उद्घाटन प्रसंगी त्यांना भोवळ आल्याने वायसीएम रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले होते. आज सकाळी त्यांची प्राणज्योत मावळली. त्यांच्या मागे त्यांची पत्नी, मुलगा, मुलगी असा परिवार आहे.
पत्रकारिता क्षेत्रात नावाजलेले पत्रकार अशी त्यांची ओळख होती. तसेच निर्भिड लिखाण करणारे पत्रकार म्हणून त्यांचा राजकीय वर्तुळात नावलौकिक होता. महानगरपालिकेच्या स्थापनेपासून ते राजकीय पत्रकारिता करत होते. त्यांच्या निधनाने पिंपरी चिंचवड शहरातील पत्रकारिता क्षेत्र तसेच सामाजिक क्षेत्रात व राजकीय क्षेत्रात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.