ताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवडपुणे

म्युकरमायकोसिसच्या 50 रुग्णांवर यशस्वी शस्त्रक्रिया

पिंपरी चिंचवड | पिंपरी-चिंचवड शहरात आतापर्यंत म्युकरमायकोसिसचे 252 रुग्ण आढळून आले आहेत. त्यापैकी 202 रुग्णांवर वैद्यकीय उपचार तर 50 रुग्णांवर शस्त्रक्रिया केली आहे. उपचारानंतर 96 रुग्ण बरे झाले. सद्य:स्थितीत 130 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. तर, म्युकरमायकोसिस आणि इतर आजार आहेत, अशा एकूण 26 रुग्णांचा आतापर्यंत मृत्यू झाला आहे, अशी माहिती महापालिका वैद्यकीय विभागाने दिली आहे.शहरात वायसीएम रुग्णालयात म्युकरमायकोसिसच्या रुग्णांवर उपचार सुरू आहेत. त्याचबरोबर काही खासगी रुग्णालयांतदेखील उपचार करण्यात येत आहेत. सद्य:स्थिती शहरातील कोरोना रुग्णांची संख्या कमी होत आहे. तसेच एप्रिल आणि मेच्या तुलनेत आता म्युकरमायकोसिसचे रुग्ण काही प्रमाणात कमी झाल्याचे दिसून येत आहे.

ज्या रुग्णांना कोरोनाची गंभीर लक्षणे होती. त्याचबरोबर मधुमेह आहे, अशा रुग्णांना म्युकरमायकोसिस होत असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे कोरोनातून बरे झाल्यावर नागरिकांनी काळजी घेणे आवश्यक आहे. तसेच कोणतीही लक्षणे दिसताच डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.तीव्र डोकेदुखी, ताप येणे, गालावर सूज येणे किंवा बधिरपणा येणे, नाक गळणे जबड्यातील हिरड्यांवर पू असलेल्या पुळ्या येणे वरच्या जबड्यातील दात हलणे, जबड्यातील टा‌ळू आणि नाकातील त्वचा याचा रंग काळसर होणे, वरच्या जबड्यातील टाळूला किंवा वरच्या भागाला छिद्र पडणे ही म्युकरमायकोसिसची प्राथमिक लक्षणे आहेत.

शस्त्रक्रियेनंतर आठ जणांचा मृत्यू!

शहरात शस्त्रक्रिया झाल्यानंतर आठ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर, म्युकरमायकोसिस आणि इतर आजार आहेत, अशा एकूण 26 रुग्णांचा आतापर्यंत मृत्यू झाला आहे. या आजारामुळे काही रुग्णांना डोळे गमवावे लागले आहेत.

ही घ्या काळजी!

तोंडामध्ये आणि नाकातील पोकळ्यांना सौम्य निर्जंतुकीकरण द्रावणाने धुणे किंवा वॉश देणे.मधुमेही रुग्णांना उपचारादरम्यान स्टिरॉइड व इतर इंजेक्शनचा नियंत्रित वापर करणे. रोगप्रतिकारशक्ती वर्धक बाबींचा आहारामध्ये समावेश करणे. लक्षणे आढळल्यास लवकरात लवकर तज्ज्ञांचा सल्ला घेणे आणि उपचार करणे.महापालिकेचे वैद्यकीय विभागप्रमुख डॉ. लक्ष्मण गोफणे म्हणाले, “म्युकरमायकोसिसची कोणतीही लक्षणे दिसल्यास त्वरित डॉक्टरांच्या सल्ल्याने उपचार सुरू करावेत. महापालिकेच्या वायसीएम रुग्णालयात म्युकरमायकोसिसच्या रुग्णांवर उपचार करण्यात येत आहेत”.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button