Breaking-newsताज्या घडामोडीपाटी-पुस्तकपिंपरी / चिंचवड

गुरुप्रती कृतज्ञता व्यक्त करत विद्यार्थ्यांनी साजरा केला शिक्षकदिन!

शिक्षण विश्व: माईरचे, एमआयटी महाविद्यालयातील कौतुकास्पद उपक्रम

पिंपरी चिंचवड : माईरचे, एमआयटी कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालय, आळंदी (डी), पुणे येथील व्यवसाय प्रशासन आणि आंतरराष्ट्रीय व्यवसाय विभागातर्फे सामाजिक विस्तार उपक्रमाचे आयोजन करण्यात आले. या उपक्रमाच्या निमित्ताने शिक्षक दिन सामाजिक जाणिवेतून साजरा करण्यात आला.

या कार्यक्रमाचे नेतृत्व तृतीय वर्ष बीबीए इंटरनॅशनल बिझनेसच्या विद्यार्थ्यांनी केले. मधुर घाटे आणि सक्षम अग्रवाल यांनी संयोजनाची जबाबदारी पार पाडली. कार्यक्रमाअंतर्गत ३० स्टील प्लेट्स, चमचे, ग्लास, पाण्याची भांडी, दोन मॅट्स, कपड्यांमध्ये जॅकेट, कुर्ता आणि पायजामा, शालेय साहित्यामध्ये नोटबुक, पेन्सिल, पेन, नैतिक कथांवरील पुस्तके, बोक्या सातबंडे ही मराठी कॉमिक्स, बिस्किटे आणि अर्धा किलो सर्फ एक्सेल यांचा समावेश होता.

या उपक्रमासाठी महाविद्यालयाचे संचालक डॉ. बी. बी. वाफरे, उपसंचालक डॉ. अक्षदा कुलकर्णी, डॉ. मानसी अतितकर, स्कूल ऑफ कॉमर्स अँड मॅनेजमेंटचे अधिष्ठाता डॉ. अमोल माने, अधिष्ठाता कॉम्प्युटर सायन्स अँड ॲप्लिकेशन प्रा. रश्मी लाड, विभागप्रमुख श्रीमती आकांक्षा लांडगे, इतर प्राध्यापकवर्ग आणि सुमारे नव्वद विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला.

हेही वाचा –  राज्याचे सहकार धोरण ठरविण्यासाठी केंद्राकडून तज्ज्ञांची कुमक

सामाजिक विस्तार उपक्रम गुरुकुलमधील विद्यार्थ्यांसोबत पार पडला. या कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी टाळ, मृदुंग, तबला, पक्वाज आणि हार्मोनियमच्या साथीने भजन, हरिपाठ आणि अभंग सादर केले. गुरुकुलमध्ये ६ ते १५ वयोगटातील मुले शिक्षण घेत असून, त्यांचे मार्गदर्शन महाराज तुषार खाटले करतात. गुरुकुल पद्धतीचे पालन येथे अत्यंत आध्यात्मिकतेने केले जाते.

या उपक्रमाच्या निमित्ताने शिक्षक दिन केवळ औपचारिकतेपुरता न राहता सामाजिक बांधिलकीचे भान राखणारा, मनाला स्पर्श करणारा अनुभव ठरला. या कार्यक्रमात डॉ. सुरेखा गायकवाड, डॉ. हनुमंत शिंगाडे आणि प्रा. दिनकर राठोड यांचीही उपस्थिती लाभली.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button