breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

‘गणेश मंडळांनी जबरदस्तीने वर्गणी मागितल्यास कडक कारवाई’; पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे

पिंपरी : गणेश मंडळांनी जबरदस्तीने वर्गणी गोळा केल्यास त्या मंडळांवर कडक कारवाई करण्यात येईल असा इशारा पिंपरी चिंचवडचे पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे यांनी आयुक्तालयात पार पडलेल्या मध्यवर्ती शांतता समितीच्या बैठकीत दिला आहे. या बैठकीला सह पोलीस आयुक्त शशिकांत महावरकर, अप्पर पोलीस आयुक्त वसंत परदेशी, माजी आमदार दिलीप मोहिते पाटील, आमदार उमा खापरे आणि आमदार अमित गोरखे हे उपस्थित होते.

पिंपरी चिंचवड आयुक्तालयात पार पडलेल्या या बैठकीत अनेक महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. त्यावर चर्चा झाली. पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीतील गणेश उत्सव शांततेत पार पडावा यासाठी ही बैठक आयोजित करण्यात आली होती. गणेश मंडळांनी धर्मादाय आयुक्तालयाच्या नियमानुसार नोंदणी करणे अपेक्षित आहे. अन्यथा त्या मंडळावर कारवाई दाखल करण्यात येईल.

हेही वाचा    –      पोलिसांनी आडवं येऊ नये, गृहमंत्री कोण आहे ते बघा; नितेश राणेंची पोलिसांना पुन्हा धमकी 

त्याचबरोबर गणेश मंडळांनी नोंदणी नसताना नागरिकांकडून जबरदस्तीने वर्गणी गोळा केल्यास त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. असा इशारा पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे यांनी दिला आहे. गणेश उत्सव म्हटलं की डीजेचा आवाज आलाच. महिला, रुग्ण, लहान मुले, वृद्ध व्यक्ती यांना जास्त त्रास सहन करावा लागणार नाही, याबाबत पोलिसांचं नियंत्रण यावर असणार असल्याचेही विनयकुमार चौबे यांनी म्हटले आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button