Breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

राज्यमंत्री मोहोळ यांच्यासह उद्योजकांची प्लास्टो प्रदर्शनाला भेट

पिपंरी :  असोशिएशन फॉर दि प्रमोशन ऑफ प्लास्टिक्सच्या वतीने मोशी येथे भरविण्यात आलेल्या प्लास्टो 2025 प्रदर्शनाला केंद्रीय नागरी वाहतूक व सहकार राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ व राज्याचे उच्च तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांनी सदिच्छा भेट दिली.या चार दिवसात सुमारे 50 हजार उद्योजकांनी भेट देवून नवीन तंत्रज्ञानाची माहिती करून घेतली.

यावेळी केंद्रीय राज्यमंत्री मोहोळ व शिक्षणमंत्री पाटील यांनी प्रदर्शनात सहभागी झालेले उद्योजक व अभ्यागतासोबत चर्चा केली. प्लास्टिक उद्योग प्रदर्शनातील नवनवीन संकल्पनांची माहिती जाणून घेत, आयोजकांचे कौतुक केले. यावेळी अभिनेते प्रवीण तरडे,असोशिएशन फॉर दि प्रमोशन ऑफ प्लास्टिक्सचे अध्यक्ष अनिल नाईक, प्लास्टो 2025 चे अध्यक्ष अजय झोड, संयुक्त अध्यक्ष निलेश पटेल, सचिव समीर कोठारी, उपाध्यक्ष एन शंकरामन , खजिनदार प्रणव बेल्हेकर, ऍडमिन आनंद कुंभोजकर, सदस्य राज मिर्जे, गोपाळ ढगे, संजय मेहरे आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी संघटनेच्या मुरलीधर मोहोळ व चंद्रकात पाटील यांचा सन्मानचिन्ह देवून सत्कार करण्यात आला.

हेही वाचा –  भाजपच्या महाअधिवेशनातील नव्या टॅगलाईनची चर्चा रंगली

दरम्यान, पिंपळे सौदागर येथे उद्योजकांसाठी विविध कला गुणदर्शन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी कच्चा माल पुरवठादार विभागात के लॉन टेक्नो पॉलिमर कंपनीला मिलेक्रॉन इंडिया कंपनीला उत्पादन विभागातून तर बेस्ट इनोव्हेटिव्ह प्रॉडक्टसाठी गुलमोहर पॅक टेक कंपनीला पुरस्कार प्रदान करण्यात आला. यावेळी अभिनेता प्रवीण तरडे, अध्यक्ष अनिल नाईक यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आला.

या प्रदर्शनामध्ये देश विदेशातील 250 कंपन्यांनी आपली उत्पादने सादर केली होती. या प्रदर्शनामुळे प्लास्टिक साठी कच्चा माल पुरवठा उद्योगवाढ , मेक इन इंडिया, नवीन स्टार्टअपसाठी उपयुक्त ठरणार आहे, अशी माहिती अध्यक्ष अनिल नाईक यांनी यावेळी दिली.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button