महिला लघुउद्योजकांच्या वस्तू प्रदर्शनाला उत्स्फूर्त प्रतिसाद
![Spontaneous response to the exhibition of goods by women micro-entrepreneurs](https://mahaenews.com/wp-content/uploads/2021/10/WhatsApp-Image-2021-10-20-at-3.35.42-PM.jpeg)
- समर्थ महिला बहुउद्देशीय संस्थेतर्फे आयोजन
भोसरी |
भोसरी आणि इंद्रायनीनगर परिसरातील महिला लघुउद्योजकांसाठी समर्थ महिला बहुउद्देशीय संस्थेतर्फे आयोजित केलेल्या वस्तू ,खाद्यपदार्थ ,आणि रोजच्या वापरातील इतर वस्तूचे प्रदर्शन व विक्रीला चांगला प्रतिसाद मिळाला. यामध्ये पिंपरी चिंचवड तसेच पुणे शहरातील महिला उद्योजकांनी सहभाग घेतला होता.
इंद्रायनीनगर परिसरात समता मित्र मंडळ येथे तीन दिवस आयोजित करण्यात आलेल्या या प्रदर्शनाचे उदघाटन प्रख्यात लेखिका मंजू काइरा, माऊंट एव्हरेस्ट शाळेच्या मुख्याध्यापक स्नेहल दराडे यांच्या हस्ते या उपक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. 17,18,19 ऑक्टोबर हे 3 दिवस महिलांनी स्टॉल्स उभारले होते. यासाठी महिलांची उल्लेखनीय उपस्थिती होती. समारोपाच्या दिवशी ब्रेन अकॅडमीच्या रेशु आगरवाल, पत्रकार अश्विनी भोगाडे, मॅक्स वूमनच्या प्रियदर्शनी हिंगे ,वाकी गावाच्या उपसरपंच योगीता जाधव, डॉ.लीना बोरुडे उपस्थित होत्या.
संस्थेच्या पदाधिकारी शोभा आरुडे, पुष्पलता शेवाळे, सुनीता हुंबरे, मीना जगदाळे, जयश्री काळे, ऍड.नीतू रामचंदानी, सीमा लिंभोरे, अंजली हलगे उपस्थित होते. दरम्यान समर्थ महिला बहुउद्देशीय संस्थेच्या तेजस्विनी लोकरे यांनी गीत गायनाचा कार्यक्रम सादर केला. संस्थेच्या संस्थापिका राजश्री गागरे यांनी कार्यक्रमाचे आयोजन केले.