सोसायटीधारकांची क्रेझ : वाकड प्रीमियर लीगच्या नवीन सिझनचा शुभारंभ!
भाजपा शहराध्यक्ष शंकर जगताप, आमदार अश्विनी जगताप यांची उपस्थिती
![Society holders' craze: Wakad Premier League's new season begins!](https://mahaenews.com/wp-content/uploads/2023/11/Wakad-Premier-Leagues-780x470.jpg)
पिंपरी: वाकड प्रीमियर लीग-पर्व ७ या क्रिकेट सामन्यांचा चषक अनावरण सोहळा चिंचवड विधानसभा मतदार संघाच्या आमदार अश्विनी जगताप व भाजपा शहराध्यक्ष शंकर जगताप यांच्या शुभहस्ते मोठ्या उत्साहात पार पडला.
वाकड प्रीमियर लीग ही संकल्पना लोकनेते आमदार लक्ष्मणभाऊ जगताप यांच्या प्रेरणेने २०१७ साली सुरु झाली असून, जगताप यांच्या स्मरणार्थ वाकड प्रीमियर लीग ह्या स्पर्धा समर्पित असणार आहेत.
वाकड प्रीमियर लीग-पर्व ७ या सामन्यांची सुरुवात लवकरच होत असून, या सामन्यांसाठी बहुसंख्य सोसायटी सभासदांनी सहभाग नोंदविलेला आहे, अशी माहिती स्पर्धेचे आयोजक माजी नगरसेवक विनायक गायकवाड यांनी दिली. यावेळी माजी स्थायी समिती सभापती ममता गायकवाड उपस्थित होत्या.
वाकड, ताथवडे, पुनावळे, रावेतसह परिसरातील सोसायटीधारकांमध्ये या स्पर्धेबाबत विशेष क्रेझ आहे. स्पर्धेच्या शुभारंभ प्रसंगी सोसायटीधारक आणि क्रिकेटप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते. माजी नगरसेवक विनायक गायकवाड यांचा हा बहुचर्चित उपक्रम आहे.