Breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

सामाजिक जाणिवा : वाढदिवस साजरा न करता पूरग्रस्तांसाठी जीवनावश्यक वस्तूंचे संकलन

पिंपरी-चिंचवडमधील भाजपा मंडलाध्यक्ष शिवराज लांडगे यांचा विधायक उपक्रम

पिंपरी-चिंचवड : सोलापूर आणि मराठवाडा परिसरात मागील काही दिवसांपासून झालेल्या मुसळधार पावसामुळे अनेक जिल्ह्यांमध्ये भीषण पूरस्थिती निर्माण झाली आहे. शेकडो गावे पाण्याखाली गेली असून, हजारो कुटुंबांच्या घरांचे, शेतीचे आणि जीवनाच्या मूलभूत गरजांचे मोठे नुकसान झाले आहे. या संकटकाळात नागरिक अन्न, पाणी, कपडे आणि औषधांसारख्या अत्यावश्यक गोष्टींसाठी संघर्ष करत आहेत.

या पार्श्वभूमीवर भोसरी विधानसभेचे आमदार महेश लांडगे यांच्या मार्गदर्शनाखाली, भारतीय जनता पार्टीचे मंडलाध्यक्ष शिवराज लांडगे यांनी एक सामाजिक आणि विधायक निर्णय घेतला आहे. त्यांनी आपल्या वाढदिवसाचे औचित्य साधून कोणताही अनावश्यक खर्च न करता, तो निधी पूरग्रस्त बांधवांच्या मदतीसाठी वापरण्याचा संकल्प केला आहे.

हेही वाचा –  खासगीकरणाविरोधात एल्गार! ९ ऑक्टोबरला महाराष्ट्रात वीज कर्मचाऱ्यांचा मोठा संप

शिवराज लांडगे यांनी आवाहन केले आहे की, “या लढ्यात आपण सर्वांनी मानवतेच्या नात्याने खारीचा वाटा उचलणे आवश्यक आहे. अन्नधान्य, कपडे, पिण्याचे पाणी, औषधे किंवा इतर जीवनावश्यक वस्तू देऊन पूरग्रस्तांना मदतीचा हात द्या. आपल्या छोट्याशा हातभारामुळे एखाद्या कुटुंबाला नवजीवन मिळू शकते.” या उपक्रमांतर्गत पूरग्रस्तांसाठी जीवनावश्यक वस्तूंचे संकलन सुरु करण्यात आले असून, अनेक सामाजिक संस्था, युवकवर्ग आणि नागरिकांनी या उपक्रमाला भरभरून प्रतिसाद दिला आहे. “आपण दिलेली मदत ही केवळ वस्तू नाही, तर ती एक आशेचा किरण आहे – जी संकटात सापडलेल्या कुटुंबांना दिलासा आणि आत्मविश्वास देईल,” असेही शिवराज लांडगे म्हणाले. तसेच, शासन आपली जबाबदारी निभावत असतानाच, नागरिकांनीही पुढे येऊन पूरग्रस्तांच्या पुनर्वसनासाठी एकजुटीने पाठीशी उभे राहण्याची हीच वेळ आहे, असेही शिवराज लांडगे यांनी म्हटले आहे.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

“मी वाढदिवस साजरा करण्याऐवजी पूरग्रस्तांसाठी मदतीचा हात पुढे केला आहे, कारण सध्या त्यांचा दु:खाचा काळ ही आपल्यासाठीही एक जबाबदारीची वेळ आहे. हे केवळ मदत नव्हे, तर माणुसकीचा खरा उत्सव आहे.”
– शिवराज लांडगे, मंडलाध्यक्ष, भाजपा.

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button