Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीमहाराष्ट्र

खासगीकरणाविरोधात एल्गार! ९ ऑक्टोबरला महाराष्ट्रात वीज कर्मचाऱ्यांचा मोठा संप

पुणे : राज्यातील तीनही वीज कंपन्यांमध्ये सुरू असलेल्या खासगीकरणाच्या प्रक्रियेच्या निषेधार्थ राज्यातील वीज कर्मचारी, अभियंते, अधिकारी आणि ४२ हजार कंत्राटी कामगार ९ ऑक्टोबर रोजी एकदिवसीय संपावर जाणार असल्याची माहिती महाराष्ट्र राज्य विद्युत कर्मचारी, अभियंता, अधिकारी कृती समितीने दिली आहे.महावितरण, महापारेषण आणि महानिर्मिती या तिन्ही वीज कंपन्यांमध्ये विविध पद्धतीने खासगीकरणाची अंमलबजावणी सुरू असल्याचा आरोप कृती समितीने केला आहे.

महावितरणच्या नफ्याच्या क्षेत्रात खासगी कंपन्यांना समांतर वीज वितरणाचे परवाने देणे, ३२९ उपकेंद्रांचे कंत्राटीकरण, महापारेषणमधील २०० कोटींपेक्षा अधिकच्या प्रकल्पांचे खासगीकरण, तसेच महापारेषण कंपनीचा आयपीओद्वारे शेअर बाजारात समावेश करण्याचा प्रस्ताव यास समितीचा तीव्र विरोध आहे. महानिर्मिती कंपनीच्या जलविद्युत प्रकल्पांचे खासगीकरण आणि वीज कर्मचाऱ्यांना मंजूर झालेल्या निवृत्ती वेतन योजनेच्या तातडीने अंमलबजावणीसाठी देखील हा संप पुकारण्यात आला आहे.

हेही वाचा –  ‘देशातील १५ साखर कारखान्यांना सीएनजी प्रकल्पासाठी साहाय्य’; अमित शहा

सन २०२३ मध्ये तत्कालीन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वीज कंपन्यांचे खासगीकरण होणार नाही, तसेच त्यांच्या आर्थिक बळकटीसाठी ५० हजार कोटी रुपयांचे अर्थसाह्य राज्य सरकारकडून दिले जाईल, असे लेखी आश्वासन दिले होते. त्यानंतर कृती समितीने संप स्थगित केला होता. मात्र, त्यानंतर प्रशासनाकडून खासगीकरणाच्या हालचाली सुरूच राहिल्या असल्याचा आरोप करण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर ९ ऑक्टोबर रोजी एकदिवसीय संप करून सरकारचे लक्ष वेधण्याचा निर्धार कृती समितीने केला आहे.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button