Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

PCMC: इंद्रायणीनगरमध्ये नम्रता लोंढे यांचा वाढदिवस विधायक उपक्रमांनी आदर्शवत!

सामाजिक बांधिलकीचे उत्तम उदाहरण : परिसरातील नागरिकांनी दिली दाद

पिंपरी-चिंचवड: “सामाजिक कार्यातून वाढदिवस साजरा” हा आदर्श सध्या फारसा दिसत नसतानाच, माजी नगरसेविका नम्रता लोंढे यांनी आपल्या वाढदिवसाचे औचित्य साधत समाजहिताचे विधायक उपक्रम राबवून सामाजिक बांधिलकी जपली. त्यांच्या नेतृत्वाखाली पूरग्रस्तांसाठी मदत, महिला सन्मान, सांस्कृतिक कार्यक्रम आणि विविध स्पर्धांमधून प्रभागात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते.

वाढदिवसाच्या दिवशीच त्यांनी भाजपा आमदार महेश लांडगे यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत एक हजार कुटुंबांना अन्नधान्य आणि अत्यावश्यक किट्सचे वाटप केले. वाढदिवसाची सुरुवात पांजरपोळ येथील गायींना चारा देऊन केली. प्रभाग स्वच्छ ठेवणाऱ्या १८० महिला सफाई कर्मचाऱ्यांना साडीचोळी देऊन सन्मानित करण्यात आले.

याशिवाय, नवरात्रोत्सव 2025 च्या पार्श्वभूमीवर घेण्यात आलेल्या स्पर्धांचा बक्षीस वितरण समारंभ पार पडला. या स्पर्धांमध्ये विजेत्यांना ई-स्कूटर, फ्रिज, एलईडी टीव्ही, वॉशिंग मशिन, पिठाची गिरणी अशी भरघोस बक्षिसे देण्यात आली. विशेष म्हणजे, कुमारी भाविका मनोज आहिरे हिची भारतीय अंडर-19 क्रिकेट संघात निवड झाल्याबद्दल तिचा विशेष सन्मान करण्यात आला.

कार्यक्रमात लोकप्रिय गायक अवधूत गांधी यांचा लाईव्ह कॉन्सर्ट व प्रसिद्ध नृत्यांगणा राधा पाटील यांचा नृत्याविष्कार रंगला. महिलांच्या कलागुणांना प्रोत्साहन देण्यासाठी दरवर्षी आयोजित केल्या जाणाऱ्या मंगळागौर आणि गौरी गणपती सजावट स्पर्धेत विजयी झालेल्या महिलांचा विशेष सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाला ज्येष्ठ माजी नगरसेवक वसंत लोंढे, सुरेश म्हेत्रे, भाजप युवा मोर्चाचे पुणे जिल्हाध्यक्ष गणेश कवडे, सामाजिक कार्यकर्ते योगेश लांढे, उद्योजक कार्तिक लांडगे, उद्योजक प्रताप मोहिते, जालिंदर कातकडे, पोलिस निरीक्षक गणेश जामदार आदी मान्यवरांची उपस्थिती होती. प्रभागातील नागरिकांनी देखील मोठ्या संख्येने उपस्थित राहून नम्रता लोंढे यांना शुभेच्छा दिल्या.

“वाढदिवस हा केवळ आनंद साजरा करण्याचा दिवस नसून, समाजासाठी काहीतरी देण्याची संधी असते. पूरग्रस्तांची मदत, महिला सन्मान आणि सांस्कृतिक कार्यक्रम यामुळे समाजाची एकात्मता अधिक बळकट होते. आपण एकत्र येऊनच पुढे जाऊ शकतो आणि प्रत्येकासाठी चांगले आयुष्य घडवू शकतो. माझ्या प्रभागातील प्रत्येक नागरिक हा माझा कुटुंब आहे, आणि त्यांच्या सेवेतच माझा खरा आनंद आहे.”
– नम्रता लोंढे, मा. नगरसेविका, भाजपा.

महिलांना केंद्रस्थानी ठेवणारी विधायक भूमिका (नम्रता लोंढे)

माजी नगरसेविका नम्रता लोंढे यांनी वाढदिवसाच्या निमित्ताने महिला सशक्तीकरणावर विशेष भर दिला. परिसर स्वच्छ ठेवणाऱ्या १८० महिला कर्मचाऱ्यांचा सन्मान, मंगळागौर व गौरी सजावट स्पर्धांमधून महिलांच्या कलागुणांना व्यासपीठ, आणि विजेत्यांना दिलेली बक्षिसे — हे सर्व उपक्रम महिला सहभागाला प्रोत्साहन देणारे ठरले. त्यांची ही भूमिका प्रभागातील महिलांसाठी प्रेरणादायी असून, “लोकप्रतिनिधी म्हणजे केवळ राजकारणी नव्हे तर समाजासाठी कटीबद्ध मार्गदर्शकही असतो” हे त्यांनी सिद्ध केले आहे.

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button