पिंपरी / चिंचवड
महिलेच्या गळ्यातील सोनसाखळी हिसकावली
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2019/05/251002-chain-snaching.jpg)
पिंपरी l प्रतिनिधी
रात्रीच्या वेळी घरातील कचरा टाकण्यासाठी पायी चालत जात असलेल्या महिलेच्या गळ्यातील सोन्याचे साखळी दोन चोरट्यांनी जबरदस्तीने हिसकावून नेली. ही घटना रविवारी (दि. 13) रात्री सव्वादहा वाजता शरदनगर, चिखली येथे घडली.
याप्रकरणी महिलेने चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार दोन अनोळखी चोरट्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी महिला आणि त्यांच्या दोन मैत्रिणी रविवारी रात्री जेवण झाल्यानंतर घरातील कचरा टाकण्यासाठी पायी चालत जात होत्या. शरदनगर चिखली येथील वीर हनुमान मंदिरासमोर आल्यानंतर एका दुचाकीवरून आलेल्या दोन चोरट्यांनी फिर्यादी यांच्या गळ्यातील 45 हजार रुपये किमतीची एक तोळे वजनाची सोन्याची साखळी जबरदस्तीने हिसकावून चोरून नेली. पोलीस उपनिरीक्षक विवेक कुमटकर तपास करीत आहेत.