Breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

कुदळवाडीत आषाढी एकादशी निमित्त फराळ वाटप

माजी स्वीकृत नगरसेवक दिनेश यादव यांचा पुढाकार; भाविकांच्या चरणी सेवा रुजू!

पिंपरी चिंचवड :  कुदळवाडी यादवनगर येथील श्री विठ्ठल-रुक्मिणी हनुमान मंदिर येथे आषाढी एकादशी निमित्त फराळ वाटप कार्यक्रम अत्यंत भक्तिभावाने आणि सेवाभावी वातावरणात पार पडला.

स्व. वै. वामन महाराज यादव, कै. नथु खंडु यादव, कै. बबाबाई नथु यादव, कै. सुदाम नथु यादव, कै. गुलाब नथु यादव यांच्या पुण्यस्मरणार्थ या उपक्रमाचे आयोजन माजी स्वीकृत नगरसेवक दिनेश यादव आणि निशा दिनेश यादव यांच्या पुढाकाराने करण्यात आले होते.

हा उपक्रम भोसरी विधानसभेचे विद्यमान आमदार महेश लांडगे युवा मंच, इंद्रायणी महिला प्रतिष्ठान, लालचंद यादव,विजयराज यादव,दत्तात्रय हरगुडे, सुरेश वाळुंज, योगेश यादव,आकश किवळे,मनोज मोरे,रामकृष्ण लांडगे, स्वराज पिजंण,विशाल उमाप, गणेश यादव,दिपक घन,रोहित कदम,विकास यादव,सोमनाथ यादव,स्वप्निल पोटघन,बालाजी पांचाळ,आकाश साळुंखे, प्रकाश चौधरी, शंशीकात पुंड,तात्यासाहेब सपकाळ,करण पाखरे आणि दिनेश लालचंद यादव मित्र परिवार यांच्या वतीने आयोजित करण्यात आले.

हेही वाचा –  देवेंद्र फडणवीस यांचं वक्तव्य; “महाराष्ट्राची कहाणी सुरु होते ती देवाच्या पावलांनी..”

पंढरपूरची वारी मंदिरातच अनुभवली!

जे भाविक प्रत्यक्ष पंढरपूर वारीस जाऊ शकत नाहीत, त्यांच्यासाठीच या मंदिरातच विठ्ठलनामाच्या गजरात, कार्यक्रम पार पडला. विठ्ठलाची प्रार्थना, भक्तिमय वातावरण, आणि फराळ वाटप यामुळे भाविकांना पंढरपूरचीच अनुभूती मिळाली.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button