पिंपरी / चिंचवड

घरात कोंडून महिलेला मारहाण केल्याप्रकरणी सहा जणांना अटक

पिंपरी l प्रतिनिधी

महिलेला घरात कोंडून मारहाण केली. महिलेला सोडविण्यासाठी गेलेल्या तिच्या मुलीला आणि मुलाला देखील मारहाण केली. ही घटना रविवारी (दि. 6) सकाळी अकरा ते दुपारी तीन वाजताच्या कालावधीत मोरवाडी पिंपरी आणि लालटोपीनगर मोरवाडी येथे घडली. याप्रकरणी सहा जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पार्वती उमेश गायकवाड (वय 40), कुंदन उमेश गायकवाड (वय 22), किरण उमेश गायकवाड (वय 19, तिघे रा. लालटोपीनगर, पिंपरी), आसिफ (वय 19, रा. मोरवाडी), अंजली लखन गायकवाड (वय 32, रा. पिंपरी), प्रतिभा (वय 36, रा. मोरवाडी, पिंपरी) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. त्यांना पोलिसांची अटक केली आहे.

सुरेखा गुंडाप्पा कुंभार (वय 41, रा. मोरवाडी, पिंपरी) यांनी याप्रकरणी सोमवारी (दि. 7) पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी या आरोपी किरण गायकवाड याच्या पिठाच्या गिरणीजवळ असलेल्या किराणा दुकानात डाळ विचारण्यासाठी गेल्या. त्यावेळी आरोपींनी फिर्यादी यांना पार्वती गायकवाड हिच्या घरात कोंडून ठेवले. तिथे फिर्यादी यांना लोखंडी रॉडने आणि लाथाबुक्क्यांनी डोक्यात आणि अंगावर ठिकठिकाणी मारून जखमी केले.

फिर्यादी यांना सोडविण्यासाठी त्यांची मुलगी पर्वा गायकवाड आणि मुलगा रवी कुंभार हे आले असता आरोपींनी त्यांना देखील मारहाण केली. पोलिसांनी सर्व आरोपींना अटक केली आहे. महिला पोलीस उपनिरीक्षक शीतल गिरी तपास करीत आहेत.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button