आंतरविद्यापीठ बुद्धिबळ स्पर्धेत सिद्धांत पिटलवार यांना सुवर्णपदक
शिक्षण विश्व : आकुर्डी, डी वाय पाटील कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग कॉलेजकडून कौतुकाचा वर्षाव

पिंपरी चिंचवड: आकुर्डी, डी वाय पाटील कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगच्या संगणक अभियांत्रिकी विभागातील विद्यार्थी सिद्धांत पिटलवार यांनी २७ व्या महाराष्ट्र राज्य आंतरविद्यापीठ क्रीडा महोत्सवातील बुद्धिबळ स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरी करत सुवर्णपदक पटकावले
ही आंतरविद्यापीठीय बुद्धिबळ स्पर्धा ४ ते ७ डिसेंबर २०२५ या कालावधीत नांदेड येथे स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ यांच्या यजमानपदाखाली पार पडली या स्पर्धेत सिद्धांत यांनी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे प्रतिनिधित्व केले होते
स्पर्धेदरम्यान सिद्धांत व त्यांच्या सहकाऱ्यांनी उत्तम सांघिक खेळ आणि डावपेचात्मक कौशल्याचे प्रदर्शन करत प्रथम क्रमांक मिळवला या यशामुळे डी वाय पाटील कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग व सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा गौरव वाढला आहे
हेही वाचा – हिंजवडीतील जिल्हा परिषद शाळेत ‘नो पॅरेंट, नो एक्झिट’ नियम
या यशाबद्दल ट्रस्टी तेजस पाटील यांनी सिद्धांत यांचे अभिनंदन करून त्यांच्या मेहनतीचे कौतुक केले कॅम्पस डायरेक्टर अॅडमिरल अमित विक्रम निवृत्त यांनी या उल्लेखनीय यशाबद्दल शुभेच्छा दिल्याप्राचार्या डॉ सौ पी मालती यांनी खेळाडूंना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या डीन प्रशासन डॉ एस एस सरनोबत डीन विद्यार्थी कल्याण डॉ स्मिता पाटसकर व रजिस्ट्रार प्रशांत भालेराव यांनीही सिद्धांत व त्यांच्या संघाचे अभिनंदन केले
कॉलेजकडून कौतुकाचा वर्षाव
शारीरिक शिक्षण व क्रीडा संचालक आबाजी एस माने यांनी खेळाडूंना मार्गदर्शन केले असून भविष्यात सिद्धांत राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर यश संपादन करेल असा विश्वास व्यक्त करण्यात आला. डी वाय पाटील कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगच्या वतीने सिद्धांत पिटलवार व त्यांच्या सहकाऱ्यांना हार्दिक शुभेच्छा देण्यात आल्या




