ताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

मोशीतील श्री नागेश्वर महाराज कुस्ती आखाडा दिमाखात

हरियाणाचा पै. साहिल कोहली ठरला श्री नागेश्वर महाराज केसरी

पिंपरी चिंचवड | मोशी गावचे ग्रामदैवत श्री नागेश्वर महाराज भंडारा यात्रा उत्सवाच्या निमित्ताने आयोजित भव्य, जंगी आणि जल्लोषपूर्ण मैदानी कुस्ती आखाडा मोठ्या उत्साहात पार पडला. श्री नागेश्वर महाराज व इतर देवदेवस्थान ट्रस्ट यांच्या वतीने आयोजित या बेमुदत कुस्ती स्पर्धेत महाराष्ट्रासह देशभरातील नामांकित पैलवानांनी सहभाग घेतला. पारंपरिक कुस्तीच्या शौर्यपूर्ण लढतींनी कुस्तीप्रेमींना थरारक क्षणांची अनुभूती दिली.

मुख्य लढतीत पै. माऊली कोकाटे विरुद्ध हरियाणाचा पै. साहिल कोहली यांच्यात गुणांवर आधारित अटीतटीची झुंज रंगली. या चुरशीच्या सामन्यात साहिल कोहली यांनी विजय मिळवत ‘श्री नागेश्वर महाराज केसरी 2026’ ची मानाची गदा पटकावली. तसेच पै. रविराज चव्हाण विरुद्ध दिल्लीचा पै. रजत मंडोली यांच्यातील तुफानी सामन्यात रविराज चव्हाण यांना दुखापत झाल्याने कुस्ती बरोबरीत सोडण्यात आली. तरीही दोन्ही पैलवानांच्या जिद्दीने आणि खेळभावनेने उपस्थितांची मने जिंकली.

हेही वाचा     :        ‘ट्राफिक बडी’मुळे बेशिस्तांवर ‘‘अंकुश’’

हा भव्य कुस्ती आखाडा श्री नागेश्वर महाराज भंडारा मैदान आमराई येथे आयोजित करण्यात आला होता. मोशी व परिसरातील हजारो कुस्तीप्रेमींनी उपस्थिती लावत आखाड्याला अभूतपूर्व प्रतिसाद दिला. अत्यंत सुनियोजित व्यवस्थेमुळे आणि ग्रामस्थांच्या सहकार्यामुळे हा सोहळा यशस्वीरीत्या पार पडला. यावेळी आमदार महेश लांडगे, ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेते, ट्रिपल महाराष्ट्र केसरी नरसिंग यादव यांच्यासह अनेक नामांकित पैलवान व क्रीडाप्रेमी उपस्थित होते. आमदार महेश लांडगे यांनी काही काळ पंच म्हणून सेवा बजावत आखाड्याची रंगत आणखी वाढवली.

“मोशी गावातील श्री नागेश्वर महाराज भंडारा यात्रा आणि त्याअंतर्गत होणारा हा भव्य कुस्ती आखाडा ही आपल्या ग्रामीण क्रीडा परंपरेची खरी ओळख आहे. तरुण पैलवानांमध्ये प्रचंड गुणवत्ता असून मोशी ग्रामस्थांनी दरवर्षीप्रमाणे याही वर्षी भंडारा उत्सवाच्या निमित्ताने कुस्ती परंपरा कायम ठेवली आहे. मोशीचा हा आखाडा महाराष्ट्रातच नव्हे तर देशात नावारूपाला येईल, असा मला पूर्ण विश्वास आहे.”

– महेश लांडगे, आमदार, भाजपा, पिंपरी-चिंचवड, पुणे.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button