धक्कादायक: पिंपरी-चिंचवडमध्ये एकाच दिवशी सहा आत्महत्या!
वाढत्या आत्महत्येच्या घटनांमुळे चिंता: गळफास घेऊन जीवन संपवले
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2025/01/Amit-Satam-25-1-780x470.jpg)
पिंपरी-चिंचवड: पिंपरी – चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत एकाच दिवशी सहा आत्महत्यांच्या घटनांची नोंद झाली आहे. शहरातील वाढत्या आत्महत्येच्या घटनांमुळे चिंता व्यक्त होत आहे.
चाकण पोलीस ठाण्याच्या हद्दीत सोमवारी (दि. २७) सकाळी साडेदहाच्या सुमारास गौरव ज्ञानेश्वर अगम (वय २८) या तरुणाने खिडकीतून भिंतीला आलेल्या लोखंडी ब्रॅकेटला ओढणीच्या सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. आत्महत्येच्या दुसर्या घटनेत प्रसाद संजय अवचट (वय ३१, रा. पुनावळे) या तरुणाने सोमवारी (दि. २७) दुपारी साडेचारच्या सुमारास गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे उघडकीस आले. आत्महत्येमागील कारण समजू शकले नाही.
हेही वाचा – हिंदुस्तान कोका-कोला बेव्हरेजेसकडून जिल्हा परिषद शाळेस डिजिटल स्मार्टबोर्ड
आत्महत्येच्या तिसर्या घटनेत विकास रामदास मुरगुंड (वय ३५, रा. गणपत लांडगे चाळ, भोसरी) या व्यक्तीने राहत्या घरात साडीच्या सहाय्याने गळफास घेतला. ही घटना सोमवारी (दि. २७) दुपारी बाराच्या सुमारास उघडकीस आली. आत्महत्येच्या चौथ्या घटनेत मनाप्पा सोमल्या चव्हाण (वय ५२, रा.शिंदेवस्ती, नेरे, ता. मुळशी) यांनी घराशेजारील लिंबाच्या झाडाला डोक्याच्या पटक्याने गळफास घेतला. ही घटना सोमवारी (दि. २७) सकाळी पावणेदहाच्या सुमारास घडली.
आत्महत्येच्या पाचव्या घटनेत नवनाथ भगवान पवार (वय ४६, रा. पवार चाळ, दत्तनगर, थेरगाव) यांनी राहत्या घराच्या शयनगृहात बेडशीटच्या सहाय्याने गळफास घेतला. ही घटना सोमवारी (दि. २७) मध्यरात्री पावणे एकच्या सुमारास उघडकीस आली. मात्र, मृत्यूचे नेमके कारण समजू न शकल्याने त्यांचा व्हिसेरा प्रयोगशाळेकडे पाठविण्यात आला आहे. आत्महत्येच्या सहाव्या घटनेत सुवर्णा श्रीराम पवार (वय ३६, रा. समीरा हाईटस्, ढोरेनगर, जुनी सांगवी)या महिलेने राहत्या घराच्या छताच्या पंख्याला गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना सोमवारी (दि. २७) रात्री बाराच्या सुमारास उघडकीस आली. सांगवी पोलीस तपास करीत आहेत.
महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा
वाढत्या आत्महत्यांमुळे चिंता…
वाढता ताणतणाव, मानसिक आजारपण याव्यतिरिक्त कर्जबाजारीपणा, कौटुंबिक वाद अशा वेगवेगळ्या कारणांमुळे शहरी आणि निमशहरी भागामध्ये आत्महत्या करण्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. लहान मुलांपासून ते वृद्धांपर्यंत आत्महत्या करणार्यांचे प्रमाण वाढत असल्याने सर्वत्र चिंता व्यक्त केली जात आहे.