धक्कादायक! पैशांची मागणी करत विवाहितेचा छळ
पिंपरी | पैशाची मागणी करत पती, सासू आणि सासर्याने विवाहितेचा छळ केल्याची घटना घडली . या प्रकरणी विवाहितेने पोलिसात फिर्याद दिली आहे. ही घटना एप्रिल 2019 ते ऑक्टोबर 2020 या कालावधीत लवळे, इनामदार वस्ती, ता. मुळशी येथे घडली.पती प्रभाकर संजय राऊत (वय 28), सासरे संजय एकनाथ राऊत आणि सासू (सर्व रा. लवळे, इनामदार वस्ती, ता. मुळशी) यांच्या विरोधात विवाहितेचा छळ केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पीडित महिलेने एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी महिला त्यांच्या पतीसह नांदत असताना आरोपींनी आपसात संगनमत करून विवाहितेकडे पैशांची मागणी केली. त्यावरून विवाहितेला शिवीगाळ करून मारहाण करत तिचा शारीरिक व मानसिक छळ केला. फिर्यादी यांनी माहेरी आल्यानंतर पोलिसांकडे तक्रार अर्ज केला होता. त्या तक्रार अर्जावरून एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.