breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

पवन मावळात भेकराची शिकार; चौघांना अटक

वडगाव मावळ : पवन मावळात भेकर जातीच्या वन्य प्राण्याची शिकार करून मांस शिजवणाऱ्या चौघांना वन विभागाने रंगेहाथ पकडले. बुधवारी (दि.१९) मळवंडी ठुले (ता. मावळ) येथे ही कारवाई करण्यात आली. आरोपींना वडगाव मावळ न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने त्यांना ६ जुलैपर्यंत वन कोठडी दिली आहे. वनपरिक्षेत्र अधिकारी हनुमंत जाधव यांनी ही माहिती दिली.

दिनेश ज्ञानेश्वर ठुले (वय ३५), गंगाराम धोंडिबा आखाडे (वय ३६) व सुनील ठोकू कोकरे (वय ३६, तिघेही रा.मळवंडी ठुले, ता. मावळ) व सुमित तुकाराम गुरव (वय १७, रा. वाळीन, ता. मुळशी) अशी शिकार करून मांस शिजवल्याच्या गुन्ह्यातील आरोपींची नावे आहेत. तर संशयित मुख्य आरोपी सचिन अशोक तोंडे (रा. मळवंडी ठुले, ता. मावळ) हा फरार असून, त्याचा शोध सुरू आहे.

हेही वाचा – Ground Report । पिंपरी विधानसभेत इच्छुकांकडून ‘अभी नहीं तो कभी नहीं’ ची लढाई!

पुणे विभागाचे मुख्य वनसंरक्षक एन. आर. प्रवीण, उपवनरक्षक महादेव मोहिते, सहायक वनरक्षक अशितोष शेंडगे यांच्या मार्गदर्शनाखाली वनपरिक्षेत्र अधिकारी वडगाव मावळ हनुमान जाधव, वन परिमंडळ अधिकारी दया डोमे, आशा मुंडे यांच्या पथकाने ही कारवाई केली.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button