breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

हरित शहर कृती आराखड्यासाठी अभिप्राय पाठवा; महापालिकेचे आवाहन

पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिका शहर धोरण 2030 च्या अनुषंगाने शाश्वत विकासाच्या दृष्टीने पर्यावरण संवर्धन,हवा,पाणी,ध्वनी प्रदूषण हरितीकरण, जैवविविधता, घनकचरा, आरोग्य,वाहतूक,एनर्जी कार्बन एमिशन, क्लायमेट चेंज सस्टेनेबल डेव्हलपमेंट, इकोसिस्टीम, ग्रीन बिल्डींग नदी पुनरुज्जीवन जलस्त्रोत पुनरुज्जीवन आदी घटकांचा  विचार करून महापालिकेच्या वतीने हरित शहर कृती आराखडा तयार करण्यात येत आहे. यामध्ये नागरिकांचा सक्रीय सहभाग महत्वाचा असून याबाबत नागरिकांनी आपले अभिप्राय 8 ऑगस्ट 2024 पर्यंत महापालिकेला कळवावेत, असे आवाहन आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांनी केले आहे.

शहराच्या लोकसंख्येमध्ये सातत्याने वाढ होत असल्याने विकासाची गरज आणि मागणी वाढत आहे. शहराचा शाश्वत विकास करत असताना त्यात पर्यावरण पूरक गोष्टींचा अंतर्भाव  करणे गरजेचे आहे. नागरिकांमध्ये देखील शाश्वतता आणि हवामानाबाबत जागरूकता वाढलेली दिसून येते.  त्या अनुषंगाने महापालिकेच्या वतीने कृती योजना तयार केला जात आहेत आणि या योजना प्रत्यक्षात आणण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत.  परंतु परिणाम प्रभावी होण्यासाठी शहरातील सर्व भागधारकांसोबत एकसंध दृष्टीकोन अवलंबणे आवश्यक आहे.  शहराला समर्पित संशोधनामध्ये गुंतवणूक करणे आवश्यक आहे, ठळक समस्यांना आधारभूत करणे, उपायांची शिफारस करणे आणि शहरातील भागधारकांच्या सक्रिय स्तरांच्या समर्थनासह त्यांची अंमलबजावणी करणे आवश्यक आहे.  पिंपरी-चिंचवड शहराचा शाश्वत विकास करण्यासाठी अशी पावले उचलण्याचा महापालिकेचा मानस आहे.

हेही वाचा   –    पिंपरी-चिंचवडमध्ये मोफत इंजीनियरिंग आणि ऑटोमेशन डिप्लोमामुळे मुली होणार सक्षम 

महापालिका लवकरच हरित शहर कृती आराखडा तयार करणार आहे, यामध्ये पर्यावरणीय शाश्वततेसाठी आवश्यक गोष्टींचा तपशील असणार आहे. या उपक्रमात आयएफसीच्या APEX या ऑनलाइन सॉफ्टवेअर टूलचा वापर करून केलेल्या हरित शहर मूल्यांकनातील निष्कर्षांचा समावेश असणार आहे. हे सॉफ्टवेअर कार्बन बचत, ऊर्जा बचत आणि खर्च यासारख्या प्रमुख निर्देशकांवर आधारित हरित शहर कृती ओळखण्यात, मूल्यांकन करण्यात आणि प्राधान्य देण्यात महत्त्वाची भूमिका बजावणार आहे.हरित शहर कृती आराखडयाचे मुख्य उद्दिष्ट इमारती, ऊर्जा, वाहतूक, कचरा आणि पाणी यासारख्या विविध क्षेत्रांमध्ये हरित गुंतवणुकीद्वारे जी.एच. जी. उत्सर्जन कमी करणे हा आहे. हा उपक्रमामुळे शाश्वत उपायांची अंमलबजावणी करण्याच्या दिशेने शहराच्या वाटचालीस गती मिळणार आहे.

शहरातील नागरिकांनी आपले अभिप्राय नोंदवून या उपक्रमात सहभाग घ्यावा.

हरित शहर कृती आराखडयासाठी https://www.pcmcindia.gov.in/marathi/green-city-action-plan.php या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्यावी.

https://forms.gle/mbCCsBzirecWwKEh6 या लिंक वर जावून गुगल फॉर्म मध्ये आपला अभिप्राय नोंदवावा.

तसेच [email protected] या मेल आय डी वर देखील आपण मेल पाठवू शकता.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button