पिंपरी / चिंचवड

सिगारेट पिण्यासाठी माचीस न दिल्याने सुरक्षा रक्षकाला बेदम मारहाण

पिंपरी l प्रतिनिधी

सोसायटीच्या गेटवर सुरक्षा रक्षक म्हणून काम करत असलेल्या एका व्यक्तीला दोघांनी सिगारेट पिण्यासाठी माचीस मागितले. मात्र सुरक्षा रक्षकाने माचीस नसल्याचे सांगितले असता दोघांनी सुरक्षा रक्षकाला बेदम मारहाण केली. ‘तुला लय मस्ती आली न. तू कशी नोकरी करतो ते आम्ही बघतोच’  अशी धमकी देखील आरोपींनी दिली. ही घटना गुरुवारी (दि. 17) सकाळी सात वाजता कोहिनूर शांग्रीला सोसायटी, शेवाळे सेंटर जवळ, पिंपरी येथे घडली.

राजेंद्र रामानंद यादव (वय 50, रा. पिंपरीगाव) यांनी याप्रकरणी शनिवारी (दि. 19) पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार कद्या आणि उम्या (पूर्ण नाव पत्ता माहिती नाही) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कोहिनूर शांग्रीला सोसायटी येथे फिर्यादी हे सुरक्षा रक्षक म्हणून काम करतात. गुरुवारी सकाळी आरोपी दोघांनी येऊन फिर्यादी यांच्याकडे सिगारेट पिण्यासाठी माचीस मागितली. त्यावर ‘माझ्याकडे माचीस नाही’ असे फिर्यादी यांनी सांगितले. ‘तुझ्याकडे नेहमीच माचीस असते. आज का नाही’ असे म्हणून आरोपींनी फिर्यादी यांना दमदाटी व शिवीगाळ केली. फिर्यादी यांनी दम द्यायचा नाही, असे म्हणून प्रतिकार केला असता आरोपींनी फिर्यादी यांना दगडाने, लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. ‘तुला लय मस्ती आली ना. तू कशी नोकरी करतो ते आम्ही बघतोच’ अशी धमकी आरोपींनी दिली असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. पिंपरी पोलीस तपास करीत आहेत.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button