सीमेड्यू स्कूल ऑफ प्रो-एक्सप्रेशनिझमचा डिझाईन एज्युकेशन फेस्टिव्हल २०२६ मध्ये सक्रिय सहभाग
शिक्षण विश्व: डिझाईन, शिक्षण आणि सर्जनशीलतेचा उत्सव पुण्यात

पिंपरी-चिंचवड : इंडस्ट्री-आधारित सर्जनशील शिक्षणासाठी ओळखली जाणारी सीमेड्यू स्कूल ऑफ प्रो-एक्सप्रेशनिझम ही संस्था पुण्यात आयोजित डिझाईन एज्युकेशन फेस्टिव्हल २०२६ मध्ये जनरल स्पॉन्सर तसेच सक्रिय सहभागी म्हणून सहभागी झाली आहे. हा महोत्सव १० व ११ जानेवारी २०२६ रोजी कळाग्राम, पी. एल. देशपांडे उद्यान, पुणे येथे होत आहे.
या फेस्टिव्हलमध्ये एज्युकेशन एक्स्पो, डिझाईन टॉक्स व पॅनल डिस्कशन्स, विविध कार्यशाळा तसेच डिझाईन फ्लिया यांचा समावेश असून, शिक्षण, उद्योग आणि सर्जनशीलतेचा अनोखा संगम अनुभवायला मिळणार आहे.
सीमेड्यूचे चेअरमन डॉ. सुशांत पाटील आणि मॅनेजिंग डायरेक्टर अॅड. अनुजा पाटील यांनी या महोत्सवातील सहभागाबद्दल सीमेड्यूच्या संपूर्ण टीमला, विद्यार्थ्यांना व सहभागी सर्वांना शुभेच्छा दिल्या आहेत. अशा व्यासपीठांमुळे विद्यार्थ्यांमध्ये नाविन्यपूर्ण विचारसरणी, उद्योगाभिमुख दृष्टिकोन आणि आत्मविश्वास विकसित होतो, असे त्यांनी नमूद केले.
हेही वाचा – प्रभाग २५ मध्ये भाजपला आयटीयंन्सचा वाढता पाठींबा

महोत्सवातील डिझाईन पॅनल चर्चांमध्ये सीमेड्यूकडून दीप अष्टाणी सहभागी होत असून, डिझाईन शिक्षणातील आधुनिक प्रवाह, उद्योगाच्या अपेक्षा आणि भविष्यातील संधी यावर ते आपले विचार मांडणार आहेत.
सीमेड्यूचे विद्यार्थी या फेस्टिव्हलमध्ये विशेष सहभाग घेत असून, ते आपली सर्जनशील प्रोजेक्ट्स सादर करणार आहेत. तसेच विविध कार्यशाळांमध्ये सहभागी होऊन भेट देणाऱ्या पाहुण्यांशी संवाद साधणार आहेत. याशिवाय, सीमेड्यूच्या विद्यार्थ्यांचा लाईव्ह म्युझिक बँड परफॉर्मन्स हे या महोत्सवाचे खास आकर्षण ठरणार असून, कला, डिझाईन आणि संगीत यांचा अनोखा संगम पाहायला मिळणार आहे.
डिझाईन शिक्षणात रस असलेल्या विद्यार्थी, पालक आणि डिझाईन प्रेमींना सीमेड्यूच्या स्टॉल क्रमांक २० ला भेट देण्याचे आवाहन करण्यात आले आहे. येथे अत्याधुनिक डिझाईन कोर्सेसची माहिती, अनुभवी प्राध्यापकांशी संवाद तसेच विद्यार्थ्यांचे प्रत्यक्ष काम पाहण्याची संधी उपलब्ध होणार आहे. सकाळी १० ते रात्री ८ या वेळेत, मोफत प्रवेशासह आयोजित करण्यात आलेला डिझाईन एज्युकेशन फेस्टिव्हल २०२६ हा सर्जनशीलता, शिक्षण आणि प्रेरणेचा उत्सव ठरणार आहे.




