पिंपरी / चिंचवड

प्रभाग २५ मध्ये भाजपला आयटीयंन्सचा वाढता पाठींबा

लोकांच्या संपर्कात अन विकासाची दूरदृष्टी असलेले लोकप्रतिनिधी हवेत : आयटीयन्सची मागणी

वाकड : प्रभाग क्रमांक २५ मधील वाकड, ताथवडे, पुनावळे परिसरात राहणाऱ्या आणि हिंजवडीसह परिसरात आयटीमध्ये काम करणाऱ्या नागरिकांनी प्रभाग क्रमांक २५ मधील भाजप उमेदवारांना पूर्ण पाठिंबा देत सलग दुसऱ्यांदा महापालिकेत भाजपाला संधी देणार असल्याचा निर्धार व्यक्त केला. वाकड, ताथवडे आणि पुनावळे भागातल्या विविध सोसायट्यामध्ये भाजप पॅनलचा झंझावती प्रचार सध्या सुरू आहे. उमेदवार राहुल कलाटे, कुणाल वाव्हळकर, श्रुती वाकडकर आणि रेश्मा भुजबळ यावेळी उपस्थित होते.

केवळ आश्वासने देणारे नेते नकोत, तर नेहमी आमच्या संपर्कात असणारे , आमचे प्रश्न ऐकून घेऊन त्यावर पर्याय देणारे नेतृत्व आम्हाला हवे आहे. असे म्हणत सोसायटीमधील महिलांनी माजी नगरसेवक राहुल कलाटे यांच्या कामाबद्दल समाधान व्यक्त करत, त्यांच्यासह भाजपच्या सर्व उमेदवारांना निवडून देण्याचा निर्धार व्यक्त केला. आमचे प्रश्न समजून घेऊन त्यावर कायमस्वरूपी उपाययोजना देणारे नेतृत्व हवे त्यासाठी नरेंद्र मोदी आणि देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली केंद्रात, राज्यात आणि महापालिकेत एकाच पक्षाचे सरकार असेल तर विकासकामे लवकर होऊन प्रकल्पांना गती मिळते, असे मत नागरिकांनी व्यक्त केले.

हेही वाचा –  पिंपरी-चिंचवडमध्ये भाजपच्या भव्य सभेत आमदार गोरखे यांनी मांडले विकास व्हिजन

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या “सबका साथ, सबका विकास” या दूरदृष्टीवर विश्वास ठेवत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रात विकासाची गती वाढली आहे. या पार्श्वभूमीवर सर्वसामान्यांसाठी आणि समाजातील प्रत्येक घटकासाठी सर्वसमावेशक विकास घडवायचा असेल, तर पिंपरी चिंचवड महापालिकेत देखील भाजपचे बहुमत आवश्यक आहे, असे मत श्रीकांत कोयते, विकास सिंग, अमोल आहेर, निलेश खोब्रागडे आणि शैलेश गिरमे यांनी बोलताना व्यक्त केले.

यावेळी कुणाल वाव्हळकर म्हणाले की “सर्व समाजाला न्याय आणि प्रतिनिधित्व देणारे भाजपाचे नेतृत्व आहे. त्यामुळेच मागील काही वर्षांत समाजातील प्रत्येक घटकाला न्याय आणि संधी मिळत आहे.” त्याचप्रमाणे रेश्मा भुजबळ यावेळी म्हणाल्या की, “प्रभाग क्रमांक २५ मध्ये यापूर्वी विकासकामे झालेली आहेत. यापुढील काळात आम्ही सर्वजण मिळून या भागाचा अधिक जोमाने विकास करू.” तसेच श्रुती वाकडकर म्हणाल्या की, “हिंजवडीमध्ये काम करणाऱ्या सर्व आयटीयंसला न्याय देण्याचा आम्ही प्रयत्न करू”

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

“वाकड ताथवडे पुनावळे भागाच्या विकासाचे नियोजन करताना आपल्याला पुढच्या किमान ५० वर्षांचा विचार करून नियोजन आणि अंमलबजावणी करावी लागणार आहे. यापूर्वी विरोधात असूनही रस्ते, पाणी, उद्याने अशी कामे मार्गी लावली आहेत. आता अधिक गतीने रस्त्यांच्या कामांना मार्गी लावून इथे शाळा, उद्याने आणि इतर विकासकामे वाढवायची आहेत.”

– राहुल कलाटे, उमेदवार भाजप

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button