शस्त्राचा धाक दाखवून तिघांना लुटले; तिघांना अटक
![While chasing the Pulsar bike, the police chased and caught him red-handed](https://mahaenews.com/wp-content/uploads/2021/07/crime-theft-police.jpg)
पिंपरी चिंचवड | शस्त्राचा धाक दाखवून तिघांनी मिळून तीन जणांना लुटले. ही घटना रविवारी (दि. 18) रात्री साडेआठ वाजताच्या सुमारास चक्रपाणी वसाहत, भोसरी येथे घडली. पोलिसांनी तीन जणांना अटक केली आहे.
संजय दादाभाऊ माने (वय 40), अजय विनायक म्हस्के (वय 27), किरण सुरेश बोबले (वय 24, तिघे रा. चक्रपाणी वसाहत, भोसरी) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. याबाबत मनोज गजानन बुध (वय 28, रा. चक्रपाणी वसाहत, भोसरी) यांनी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी फिर्यादी आणि त्यांच्या दोन मित्रांना रविवारी रात्री साडे आठ वाजताच्या सुमारास चक्रपाणी वसाहत मधील पांडवनगर दोन येथे रस्त्यात आडवले. त्यांना लोखंडी सूऱ्याचा धाक दाखवून मोटरसायकल, मोबाईल फोन आणि रोख रक्कम असा एकूण 35 हजारांचा ऐवज जबरदस्तीने चोरून नेला. पोलिसांनी तिन्ही आरोपींना बेड्या ठोकल्या आहेत. भोसरी पोलीस तपास करीत आहेत.