एसएनबीपी विधी महाविद्यालयात रक्तदान व मोफत आरोग्य शिबीरास प्रतिसाद
![Response to Blood Donation and Free Health Camp at SNBP Law College](https://mahaenews.com/wp-content/uploads/2021/10/1d12f99d-863b-47ae-b460-4d78ff94c473.jpg)
पिंपरी : प्रतिनिधी
पिंपरी येथील एस. एन.बी.पी. विधी महाविद्यालयात महात्मा गांधी जयंती तसेच एस. एन.बी.पी. फौंउडर्स डे या निमित्ताने रक्तदान शिबीर व मोफत आरोग्य तपासणी शिबीराचे आयोजन करण्यात आले. या शिबिरास चांगला प्रतिसाद मिळाला.एस. एन.बी.पी. विधी महाविद्यालय आणि मिलाग्रेस फौउडेशन, वाघोली, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या शिबिराचे उद्घाटनप्रसंगी . डॉ. जतीन डूगड, नाडी परीक्षा तज्ञ, मिलाग्रेस फाउंडेशन अध्यक्ष जॉन फर्नाडीस अध्यक्ष , संस्थेचे अध्यक्ष डॉ. डी. के. भोसले, एस. ई. सोसायटी अध्यक्षाडॉ. वृषाली भोसले, संचालिका ऋतुजा भोसले, समन्वयक प्रा. स्वप्नील जाधव आदी मान्यवर उपस्थित होते.
प्राचार्या डॉ. रोहीणी जगताप यांनी महात्मा गांधी यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.ऍडव्होकेट जोसेफ फर्नाडीस , पिंपरी चिंचवड ब्लड बँक कर्मचारी , संत तुकाराम नगर पिंपरीचे वैद्यकीय कर्मचारी , कार्यक्रमाचे समन्वयक प्रा. स्वप्नील जाधव , एस. एन.बी.पी. विधी महाविद्यालयातील शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी व महाविद्यालयातील विद्याथी उपस्थित होते.डॉ. रोहीणी जगताप यांनी सर्वांचे स्वागत केले.
महाविद्यालयातील शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी तसेच विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे रक्तदान केले.डॉ. जतीन डूगड यांनी मोफत आरोग्य तपासणी केली. तसेच आहार, व्यायाम आणि निरोगी शरीर याबद्दल मार्गदर्शन करून आर्युवेदिक पद्धतीने उपचार केले. तसेच योगांसनाचे फायदे समजावून सांगितले.