Breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड
निगडी प्राधिकरणमधील संत ज्ञानेश्वर चौकात प्रजासत्ताक दिन उत्साहात
माजी उद्यान अधिक्षक दत्तात्रय गायकवाड यांची प्रमुख उपस्थिती
![Republic Day celebrations at Sant Dnyaneshwar Chowk in Nigdi Authority](https://mahaenews.com/wp-content/uploads/2025/01/Republic-Day-celebrations-at-Sant-Dnyaneshwar-Chowk-in-Nigdi-Authority-780x470.jpg)
पिंपरी-चिंचवड | निगडी प्राधिकरणमधील संत ज्ञानेश्वर चौकात ७६ वा प्रजासत्ताक दिन हा शिवतेज प्रतिष्ठान, निगडी यांच्या वतीने मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे माजी उद्यान अधिक्षक दत्तात्रय गायकवाड उपस्थित होते. त्यांच्या हस्ते ध्वजारोहण करणेत आले. त्यानंतर राष्ट्रगीत गायन होऊन पेढे वाटप करून कार्यक्रमाची सांगता झाली.
हेही वाचा : शिक्षण विश्व: लेझीमच्या प्रात्यक्षिकांमधून स्वातंत्र्य सैनिकांचे स्मरण!
कार्यक्रमाचे आयोजन शिवतेज प्रतिष्ठान चे अध्यक्ष श्री. सुरेश वाडकर यांनी केले. यावेळी रविंद्र चौधरी, दिलीप गोसावी, सुनील म्हस्के, प्रफुल्ल पोटफोडे, गणेश वाडकर, नूर बागवान, कांताराम कशिद तसेच परिसरातील ज्येष्ठ नागरिक व तरुण मोठ्या संख्येने उपस्थित होते.