breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

पवना, मुळा, इंद्रायणी नदीतील जलपर्णी हटवा !

सोसायटी फेडरेशनची मागणी : नदी प्रदूषण करणाऱ्या कंपन्यांवर कारवाई करा

पिंपरी : शहरातील इंद्रायणी, पवना, आणि मुळा या नद्यांच्या पात्रातील जलपर्णी काढणे बाबत व विविध कंपन्यांचे केमिकल मिश्रीत पाणी या नदीमध्ये सोडणाऱ्या कंपन्यांवर कारवाई करावी, अशी मागणी चिखली-मोशी- पिंपरी-चिंचवड हाउसिंग सोसायटी फेडरेशनचे अध्यक्ष संजीवन सांगळे यांनी केली आहे.
याबाबत महापालिका आयुक्त शेखर सिंह यांना निवेदन देण्यात आले आहे. त्यामध्ये म्हटले आहे की, पिंपरी-चिंचवड शहरातून वाहणाऱ्या इंद्रायणी, पवना व मुळा या नद्यांच्या पात्राणांमध्ये खूप मोठ्या प्रमाणात जकपर्णी वाढलेली आहे. त्यामुळे तिथे खूप मोठ्या प्रमाणात डासांची पैदास होत आहे. तसेच नुकतेच पुणे शहरात झिका या डासांपासून होणाऱ्या भयंकर आजाराचे आपल्या शेजारील शहरात रुग्ण सापडले आहेत. झिका हा आजार स्वछ साठलेल्या पाण्यात पैदास होणाऱ्या एडिस इजिप्ती या डासाच्या चावल्याने होणारा आजार आहे आणि या डासाची पैदास प्रामुख्याने या जलपर्णी असणाऱ्या नदी प्रवाहात होते. त्यामुळे नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने महत्वाचा विषय असल्याने या तिन्ही नद्यांमधील जलपर्णी ताबडतोब काढण्याची कार्यवाही करण्यात यावी. अन्यथा झिका हा आजार मोठ्या प्रमाणात पसरण्याची शक्यता आहे.
तसेच या तिनी नद्यांच्या आजूबाजूच्या कंपन्या व कारखान्यांमधून निर्माण होणारे केमिकलयुक्त पाणी या नद्यांच्या पात्रात सोडले जाते. त्यामुळे या नद्यांचे खूप मोठ्या प्रमाणात पाणी प्रदूषित होत आहे. तरी संबंधित कंपन्या व कारखाने यांच्यावर कारवाई करावी व हे पाणी सोडणे बंद करण्यास सांगावे आणि नद्यांचे पावित्र्या अबाधीत राखावे, अशी मागणीही सोसायटी फडरेशनच्या वतीने करण्यात आली आहे.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button