ताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड
‘नंबर ब्लॅक लिस्ट मधून काढून टाक, नाहीतर अंगावर ॲसिड फेकेन’
पिंपरी चिंचवड | ‘नंबर ब्लॅक लिस्ट मधून काढून टाकला नाही तर अंगावर ॲसिड फेकेन’ अशी धमकी देऊन महिलेचा विनयभंग केल्याचा धक्कादायक प्रकार भगवंत कृपा बिल्डिंग, काळेवाडी फाटा येथे गुरुवारी (दि.16) घडला. याप्रकरणी एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.याप्रकरणी संबंधीत महिलेनं शुक्रवारी (दि.17) वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार मनिष अशोक मारकळ या व्यक्तीच्या विरोधात भारतीय दंड विधान कलम 354, 504, 506 अंतर्गत विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.





