पिंपरी / चिंचवड

पार्टी देण्यास नकार दिल्याने भावकीतील नातेवाईक तरुणावर कोयत्याने वार

पिंपरी l प्रतिनिधी

पार्टी देत नाही असे म्हटल्याने भावकीतील दुरच्या नातेवाईकाने एकावर कोयत्याने वार करत खुनी हल्ला केला. ही घटना बुधवारी (दि. 19) रात्री साडेआठच्या सुमारास देहूगावातील चव्हाणनगर येथे घडली.

निखिल नंदनराज चव्हाण (वय 32, रा.देहूगाव ) यांनी या प्रकरणी गुरुवारी (20 जानेवारी) देहूरोड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, आकाश चंद्रकांत पाटोळे (वय 28, रा.देहूगाव) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे आपले नातेवाईक सर्जेराव ओव्हाळ उर्फ दावडीकर घरासमोरील मोकळ्या मैदानात मित्रांसोबत नाचत होते. त्यावेळी त्यांच्या भावकीतील दुसचा नातेवाईक असणारा आरोपी पाटोळे तेथे आला. त्याने फिर्यादी यांच्याकडे पार्टी मागितली. मात्र, फिर्यादी यांनी पार्टी देण्यास नकार दिल्याने त्याने लोखंडी कोयत्याने त्यांच्यावर वार केला. या हल्ल्यात फिर्यादी यांच्या डोक्याला इजा झाली आहे. पुढील तपास देहूरोड पोलीस करीत आहेत.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button